Ticker

6/recent/ticker-posts

सोशल मिडिया, वर्तमान पत्रे, गावाच्या चौक चौपाटी ते कट्टया वट्टया पर्यंत सर्वत्र 'किनवट नगर परिषदेच्या 19 कोटीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या बोगस कामाची व भ्रष्टाचाराची चर्चा असतांना देखील वरिष्ठ अधिकारी मात्र झोप्या वस्थेत


सोशल मिडिया, वर्तमान पत्रे, गावाच्या चौक चौपाटी ते कट्टया वट्टया पर्यंत सर्वत्र 'किनवट नगर परिषदेच्या 19 कोटीच्या वाढीव पाणी 

पुरवठा योजनेच्या बोगस कामाची व भ्रष्टाचाराची चर्चा असतांना देखील वरिष्ठ अधिकारी मात्र झोप्या वस्थेत.

किनवट नगर परिषदे मार्फ़त हॉट असलेल्या 19 कोटीच्या बलाढ्य अंदाज़ पत्रकाच्या वाढीव पाणी 

पुरवठा योजनेच्या कामाची सुरुवात झाल्यापासून सर्वत्र या कामाच्या भ्रष्टाचाराची चर्चा ऐकावायास मिळत आहे, 

गावाचा प्रत्येक नागरिक या बोगस कामा विषयी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत.

👉28कोटिंच्या नव्या रस्त्यांचा चुराळा झाला.


👉जुन्या रस्त्यांची तर वाटच लागली.


👉जागो जागी जूनी पाइप लाइन फुटली.
 
👉अगोदर पाणी टाकी बांधून त्यांची पाणी प्रवाह क्षमता लक्षात घेऊन प्रत्येक प्रभागात किती खोल पाइप टाकावे लागेल त्या प्रमाणे पाइपलाइन टाकाव्याचे होते, पण तसे झाले नाही.


👉पहिले पाइप नंतर टाकी असे काम चालू असल्याने वरच्या ठिकाणच्या प्रभागात पाणी समस्या कायम राहुन ही योजना सपशेल फेल ठरन्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


👉अंदाज़ पत्रका प्रमाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा मान्यता प्राप्त नसलेल्या अगदी कमी किमतीचा पाइप वापरला जात असल्याने भविष्यात पुन्हा जागो जागी पाइप फुटण्याची शक्यता.

👉सोशल मिडिया वर पाइप च्या  फोटो टाकून पाइप च्या कीमती विषयी पैजा लागत आहेत.


👉खरंच पाइप हल्क्या प्रतिचा असेल तर आपल्यला पाणी येणार की नाही, लोक या विषयी चिंता व्यक्त करतांना दिसत आहे.


👉तसेच गल्ली बोळयात खोदकाम करुन खड्डे सोडून दिल्याने वृद्ध नागरिकांना व लहान मुलांना खूप त्रास होत आहे अनेक लहान मुले गीट्टी दगळामुळे ज़ख़्मी होत आहेत.


👉छोटे मोठे अपघात ही वाढले आहे.
या कामा संबंधित अश्या अनेक प्रकारच्या शंका कुशंका,

 नाराजी सोशल मिडिया वर्तमान पत्रे आणी चौका चौकात व्यक्त केल्या जात आहे, 

असे असतांना देखील नगर परिषदेच्या अधिकारी आणी सर्व पदाधिकारी यांना याचा तीळ मात्र फरक पळत नाही. 

सर्व ज़िम्मेदारी गु्त्तेदारवार व घरी बसून एम.बी रेकार्ड करणाऱ्या अभियंतावर टाकून आमचे लोकप्रतिनिधी मात्र हात वर करीत आहे.

खऱ्या अर्थाने अश्या बोगस कामाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्याव्याची होती मात्र ते ही या बोगस कामाकळे स्पष्ट डोळेझाक करीत आहे. 

वरिष्ठ अधिकार्याच्या अनदेखीमुळे बोगस काम करणार्यांना का प्रकारे पाठबळ मिळत आहे.

शेवटी  हा बोगस काम असाच चालू राहिल्यास, संतापलेल्या जनते मुळे या कामा विरोधात


नाईलाजाने जनआक्रोशाने एखादा मोठा जन आंदोलन होन्याची चर्चा ऐकाव्यास मिळत आहे.