Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता ???? *लॉकडाऊन वाढण्याची शक्यता* बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय*


महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांनी 15 मेपर्यंत लॉकडाऊचा निर्णय घेतला होता.

 यामध्ये अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली होती. 

मात्र कोरोना अजुनही आटोक्यात आला नसल्याचं चित्र आहे. 

त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाणार असल्याची शक्यता आहे, 

असा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. 
त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

 राज्यात 15 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही.

नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज कडक लॉकडाऊण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
 तर जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यामुळे 15 मेनंतरच्या लॉकडाऊनबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्रीच घेणार आहेत.

दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारत असली तरी काही जिल्ह्यात 
मात्र कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.

 अशावेळी राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक पातळीवर लॉकडाऊनची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. 

त्यात रुग्णालये आणि औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत.