Ticker

6/recent/ticker-posts

माहूर पोलीसांचा अवैध दारू अड्यावर छापा. 7430रूपयाचा मुद्देमाल जप्त


माहुर कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ताळेबंदी लागू केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने    बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्या स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले.

 त्यातच मध्यप्राशन केल्याने कोरोना होत नाही अश्या गोड गैरसमजातून दारू पिणार्यांच्या संखेत भरमसाठ वाढ झाली 

असून खेडोपाडी वाडी तांड्यात दारुचा महापूर वाहात आहे असे असताना माहूर पोलीस ठाण्यात हदीतील ईवळेश्वर गावाच्या समोर

 नाल्याच्या पलीकडे असलेल्या फूलसिंग राठोड यांच्या शेतात मोहफूलाची गावठी दारू गाळून विक्री करीत

 असल्याची गोपनीय माहिती आधारे  पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार विजय आडे,

 पो. काॅ नागरगोजे, प्रकाश देशमुख,चालक गूरणूले यांनी दि. 21मे2021रोजीदूपारी साडेतीन वाजता 

अवैध दारू अड्यावर छापा टाकून एक पिवळ्या रंगाच्या कॅनमध्ये 10लीटर दारू किमत 1000रूपये,टीन पत्र्याच्या डब्यातव निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये 80 लीटर

 फसफसते रसायन किंमत अंदाजे 5600रूपये 830 रुपये रोख रक्कम असा एकून सात हजार 430रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला 

असून दारू 180मीली काचेच्या बाटलीत वेगवेगळ्या भरून पंचासमक्ष जप्त करून त्यावर पंचाच्या सह्या असलेल्या चिठ्या लावून सीएल 

सॅंपलसाठी पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या व उर्वरित माल पंचासमक्ष नष्टकरण्यात आला 

पो. हे. काॅं. प्रकाश देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी उध्दव गंभीरा राठोड याचे विरोधात मुंबई पोलीस कायदा कलम 65 ई व 65एफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

असून आरोपीस अटक करून जामीनावर सुटका करण्यात आली असून या प्रकरणाचा पूढील तपास बिट जमादार विजय आडे करीत आहेत