Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीने नगर परिषद प्रांगणात भव्य रक्तदान व प्लाझादान शिबीर घेण्यात आला


महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीने नगर परिषद प्रांगणात भव्य रक्तदान व प्लाझादान शिबीर घेण्यात आला. 

सध्याचा Covide 19 ची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे, 

याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर घेण्याचे योजिले आहे, 
याचीच सुरुवात म्हणून किनवट शहरात गोळवलकर गुरुजी रक्त संकलन केंद्राच्या मदतीने रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर  पार पडले, 

या शिबिरात 65 रक्तदात्यांनी सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. 
मागील वर्षभरात कोविडच्या काळात अभाविपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, येत्या 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे,

 एकदा लस घेतली कि किमान 2 महिने रक्तदान करता येत नाही. 

त्यामुळे लस घेण्यापूर्वी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे यासाठी अभाविपने हा उपक्रम हाती घेतला आहे. 
यावेळी गटविकास अधिकारी श्री धनवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय मुरमुरे,  

नगराध्यक्ष श्री आनंद मच्छेवार, रा.स्व.सं. जिल्हा संघचालक श्री संतोषजी तिरमनवार,

 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक नेम्मानीवार, भाजपा तालुका अध्यक्ष श्री संदिप केंद्रे, शहराध्यक्ष 

श्री श्रीनिवास नेम्मानीवार, विहिपचे विभागमंत्री श्री अनिरुद्ध केंद्रे, युवा मोर्चा ता.अ. श्री उमाकांत कऱ्हाळे, श्री विठ्ठलराव मच्छर्लावार,

 श्री संतोष रायेवार पत्रकार श्री किरण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 शिबिर यशस्वीतेसाठी अभाविप पूर्व कार्यकर्ते प्रवीण श्रीमनवार, अभाविप शहराध्यक्ष चंद्रकांत नेम्मानीवार,
 शहरमंत्री आशुतोष बेद्रे,निकेतन सुरोशे, विनायक ठोंबरे, शुभम काळे, आदर्श राणे, शुभम कोंकलवार, 

श्रेयस दुल्लरवार, सुरेश साकपेल्लीवार, वैभव गरड, करण न्यालमवार, शिवकुमार शिरपुरे यांनी परिश्रम घेतले.