Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि १२ राज्य शासन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता राज्यात लॉकडाऊन लावुन सर्व व्यवहार ठप्प करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता प्रयत्न करत आहे परंतु यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या नाकर्तेपणामुळे कोणताही सुधार होतांना दिसत नाही


किनवट ता.प्र दि १२ राज्य शासन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता राज्यात लॉकडाऊन लावुन सर्व व्यवहार ठप्प करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता प्रयत्न करत आहे परंतु यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या नाकर्तेपणामुळे कोणताही सुधार होतांना दिसत नाही.

     

  गोकुंदा येथिल डि.सी.सी मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली चालु असुन येथे येणा-या रुग़्नांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर या ठीकाणी गेलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणुची लागण होण्याची शक्यता बळावल्याने 

गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालय हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे एकुणच तेथिल कारभारावरुन निदर्शनास येत आहे. येथे लसिकरणा करीता एकच गर्दी उसळलेली निदर्शनास आली 

तर सोशल डिस्टसिंगचा फज्जा यामुळे उडालेला होता त्यातच कोरोना बाधित किंवा तपासणी करण्याकरिता आलेल्या व्यक्तींची तपासणी एकाच ठीकाणी होत असल्याने येथिल संचार हा धोकादायक बनला आहे.

 अशा स्थितीत व्यक्ती या ठीकाणी दुरुस्त होण्यासाठी जाईन कि तो तेथुन आजारी होऊन येईल याची शास्वती नाही.

    

   अनेक असुविधांचे माहेरघर म्हणजे गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालय व तेथिल कोविड सेंटर आहे अशी आजची त्या सेंटरची अवस्था आहे 

याकडे जिल्हाशल्य चिकित्सकांनी लक्ष द्यायला हवे या बरोबर लोकप्रतिनिधींनी सुध्दा येथिल नागरी सुविधा करीता ठीक ठीकाणी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. 

किनवट व गोकुंदा येथिल लसीकरण केंद्र हे पुर्णपणे बंद करण्यात आले आहे या ठीकाणे लस उपलब्ध नसल्याने ते रद्द करण्यात आले आहे.

 तर डि.सी.सी येथे पहिला डोस, दुसरा डोस त्या दरम्यानचा कालावधी व पहिला डोस कोवॅक्सीनचा कि कोविशिल्डचा यासर्व माहिती मध्ये सावळा गोंधळ उडत असल्याने येथिल लसीकरण मोहिम हि भगवान भरोसे असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

अशा स्थितीत यासर्व गोंधळात त्याठीकाणी गेलेल्या व्यक्तीला गुदमरल्या सारखे झाले नाहीतरच नवल त्यातही जे रुग्ण कोरोना मुळे गंभीर आहेत ते हि तिथेच आहेत 

तर उपचारादरम्यान मृतव्यक्तीची प्रेत हि त्या ठीकाणीच ठेवले जात असल्याने एकुणच गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालय हे कोणत्या स्वरुपाचे आहे याचे विवरण करायला शब्दच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

   

    यासर्व असुविधांकडे कोणी लक्ष देणार आहे कि नाही कि जनतेला असेच वा-यावर सोडुन दिले जाणार आहेत याबाबत नागरीकांचा तिव्र रोष हा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरावरील अधिकारी, 

कर्मचा-यांविरुध्द आहे या बाबत तातडीने सुधारणाकेली जाने आवश्यक आहे अन्यथा अशाच प्रकारच्या अनेक लॉकडाउन लावुन हि परिस्थिती सुधारली जाणार नाही. 

तरी गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या स्ट्रक्चर मध्ये तातडीने बदल करणे आवश्यक झाले आहे 

ज्याठीकाणी नविन तपासणी होते त्याच्या दारावरच कोरोना बाधित रुग्ण असतात तर बाधित रुग़्णाचा संचार हा तिथे असतो अशा स्थितीत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ 

शकतो त्यामुळे तपासणीची जागा बदलली गेली पाहिजे हि मागणी नागरीकांकडुन केली जात आहे.