Ticker

6/recent/ticker-posts

आज पिंपरी चिंचवड येथे आम आदमी पार्टी च्या वतीने सनितायझर आणि मास्क चे वाटप करणेत आले.


**
दिनांक :  १५-मे-२१

आम आदमी पार्टी चिंचवड विधानसभा कडून कोरोना काळा मध्ये फ्रंट लाइन कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. 

यात सफाई कामगार, पोलिस कर्मचारी, आणि रिक्षा चालक  सामील होते.


सामान्य लोकांचे हित लक्ष्यात ठेवून आम आदमी पार्टी नेहमीच अनेक उपक्रम राबवत असते. 
 
कोरोना काळा मध्ये सफाई कर्मचारी स्वताःचा जीव धोक्यात घालून आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवतात.

 तसेच पोलीस कर्मचारी शहराची 24 तास सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. 

पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद असतानाही सामन्य नागरिकांना सेवा देणारे आपले रिक्षा चालक 

आणि त्यांच्या परिवाराची काळजी म्हणुन यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

या वेळी आम आदमी पार्टी चे पदाधिकारी चिंचवड विधान सभेचे अध्यक्ष सागर सोनवणे, शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, 

महिला कार्यकर्ता तेजस्विनी मॅडम आणि पिंपरी चिंचवड शहर सचिव राघवेंद्र राव उपस्थित होते.

हा कार्यक्रम किवले, विकास नगर व मुकाई चौक मध्ये पार पडला.

श्री. महेश बिराजदार आणि श्री. सागर सोनवणे यांनी त्या सोबतच महिला कामगार साठी महाराष्ट्र शासना ची योजने साठी त्यांना मार्गदर्शन केले. 

तसेच रिक्षा चालक व बांधकाम कामगारां साठी प्रत्येकी रु. ५,००० साठी आयुक्ता कडे मागणी केलेली आहे. 

जर मागणी मान्य झाली तर त्याचा फायदा या कामगार वर्गांना मिळवून देण्याच्या प्रयत्न करू. 

असे आश्वासन पार्टी कढून देण्यात आले.