Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना काळातील संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या व पोलीस ठाण्यात गोंधळ घालून शासकीय कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या गुटका माफिया वर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात यावा


महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन

प्रति , मा.पोलिस अधिक्षक साहेब , पोलिस मुख्यालय नांदेड .

 विषयः कोरोना काळातील संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या व पोलीस ठाण्यात गोंधळ घालून शासकीय कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या गुटका माफिया वर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात यावा बाबत.


 पोलीस असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्ष पद्माताई गिरऱ्हे               

  महोदय , उपरोक्त विषयी आपल्या सेवेत विनंती सादर करण्यात येते कि , सिंदखेड पोलिस स्थानक हद्दीमध्ये गुटखा माफियांनी उच्छाद मांडला आहे
 त्यांची मजल पोलिसांना पोलिस स्थानकात जाऊन धमकावण्यापर्यंत पोहचली आहे . 

अशा स्थितीत कायदा हा सर्वाना सारखा असतो व सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये अहोरात्र डोळ्यात तेल टाकुन कर्तव्य निभावणा - या 

पोलिसांचे मनोधैर्य खचेल असे कृत्य सारखणी 
वाई ( बा ) या भागात गुटखा तस्करी करणा - यां तस्करांकडुन करण्यात आले आहे . 

जिल्हयात सध्या संचारबंदी लागु असुन विनाकारण फिरणा - यांना पायबंद करणे हि पोलिसांची जबाबदारी आहे जे कि पोलिस विभागाकडुन उत्कृष्ठरीत्या निभावण्यात येत आहे 

परतु मौजे वाई ( बा ) ता , माहुर येथे दिनांक १८ एप्रिल रोजी सायं ७ वाजेच्या सुमारास पोलिस गस्तीवर असतांना त्यांना त्यांच्या सूत्रानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वाई ( बा ) 

येथे संशयीत रित्या हालचाली करत असलेली वाहन कं एम एच ०४ सि.एम ४८६२ हिला थांबवुन विचारणा केली त्यावेळी त्यातील प्रवासी व संशयीत मोहमंद इदीस छाटीया व असलम हमीद बानानी 

दोन्ही रा.सारखणी यांनी त्यांना पोलिसांनी थांबतुन विचारणा का केली हा प्रश्न विचारत सिंदखेड पोलिस स्थानकात गोंधळ घालण्यास सुरवात केली 

तरी सदर घटनेची सिंदखेड येथिल पोलिस स्थानकात रितसर नोंद असतांना व कायद्याच्या सर्व प्रक्रीयांचे पालन पोलिसांकडुन झालेले असताना सदर दोन्ही संशयीत जे पुर्वी अशा प्रकरणामध्ये आरोपी आहेत

 ते पोलिस स्थानकात आऊन पोलिसांना धमकावण्यापर्यंत मजल मारत असेल तर अशा समाजविघातक व्यक्ती विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करावा   

आठ दिवसात गुन्हा नोंद झाला नाही तर पोलिस असोशिषण तर्फे उपोषण करण्यात येईल 

असे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने निवेदन द्वारे करण्यात येत आहे.....

प्रतीलीपी:१) मा.पोलीस महासंचालक,मुख्यालय,मुंबई, 
२) मा.पोलीस उमहानिरीक्षक,नांदेड परिक्षेत्र,नांदेड. 
3 मा. उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर