Ticker

6/recent/ticker-posts

कोठारी (चिखली) ग्रामपंचायत अंतर्गत आय्याप्पा मजूर सहकारी संस्थेच्या वतीने आमदार फंड दहा लक्ष रुपयाचे काम बोगससरपंच/ग्रामसेवक यांचे संगणमत की दुर्लक्ष



कोठारी (चिखली) ग्रामपंचायत अंतर्गत आय्याप्पा मजूर सहकारी संस्थेच्या वतीने आमदार फंड दहा लक्ष रुपयाचे काम बोगस
सरपंच/ग्रामसेवक यांचे संगणमत की दुर्लक्ष!

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

कोठारी ची ग्रामपंचायत अंतर्गत आमदार भीमराव केराम यांनी गावाचा विकास या 

सदराखाली लहुजी साळवे गृहनिर्माण संस्था येथे आय्यप्पा मजूर सहकारी संस्था यांच्यातर्फे

 दहा लक्ष रुपये आमदार फंडातून रस्त्याचे काम चालू असून सदर काम बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.


किनवट पंचायत समितीपासून किनवट ते नांदेड रोडवर पाच किलोमीटर अंतरावर कोठारे ची ग्रामपंचायत अस्तित्वात आहे 

सदर ग्रामपंचायतीअंतर्गत लहुजी साळवे गृहनिर्माण संस्था पंचवीस वर्षांपासून अस्तित्वात असून ग्रामपंचायती अंतर्गत या संस्थेमध्ये आजपर्यंत 
एकही मूलभूत सुविधा पुरविण्यात आली नाही सदर संस्था रोड लगत असून संस्थेमध्ये 50 टक्के नागरिकांनी घर निर्माण केले आहे 

आमदार भीमराव केराम यांना संस्थेच्या वतीने विनंती केल्यानुसार आमदार यांनी स्वतःच्या फंडातून सीसी रोड साठी दहा लक्ष रुपये मंजूर केले होते 

यानुसार सदर कामाचे टेंडर कनिष्ठ अभियंता श्री रमेश बाद्धेवार यांनी त्यांचे नातेवाईक यांच्या अय्यप्पा मजूर सहकारी संस्थेचे सोडून घेतले 

परंतु सदर संस्थेमार्फत काम करणारे हे नातेवाईक असल्याने कामावर अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम न करता 

स्वतःच्या मर्जीप्रमाणे सदर काम करत असून सदर रस्त्याचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे  होत असल्याची खंत व्यक्त करत सदर कामाची तक्रार 

लहुजी साळवे संस्थेच्या वतीने वरिष्ठाकडे करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सभासदांनी प्रतिनिधी जवळ व्यक्त केले. 

या कामाबाबत सहाय्यक अभियंता श्री पाठक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता 

श्री पाठक यांनी संस्थेच्या सभासदांनी लावलेला फोन आज पर्यंत उचललेला नाही 

यामुळे त्यांचे सुद्धा सदर बोगस कामास मूक संमती असल्याचे दिसून येते 

तसेच फोन न उचलल्याने संस्थेचे सभासद श्री राज माहुरकर यांनी स्वतः कार्यालयाशी संपर्क केला असता 

साहेब नांदेड वरून येणंजाणं करतात कधी येतात कधी जातात ते आम्हाला माहीत नसते असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.