Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस प्रशासनाने दिव्यांग कायदा कलम ९२ ची काटेकोर पणे अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय द्यावा दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर


पोलिस प्रशासनाने दिव्यांग कायदा कलम ९२ ची काटेकोर पणे अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय द्यावा दिव्यांग 
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

   नांदेड 
 दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे मान सन्मानाने त्यांचे जीवन जगता यावे 

म्हणून शासनाने  दिव्यांग कायदा २०१६ रोजी अंमलात आला पण आजही 

अनेक पोलिस प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी करीत नसल्याचे लक्षात येत आहे. 
  

    माननीय पोलिस अधिक्षक साहेबांनी दिव्यांग कायद्याची कडक 

अंमलबजावणी करण्याचे कनिष्ठ अधिकारी यांना आदेशित करून दिव्यांगाना न्याय द्यावा 
   

   दिव्यांग कलम ९२ ए. बी, सी 
नुसार ज्या दिव्यांगाना सार्वजनिक ठिकाणी हिन वागणुक, दिव्यांगावर बोलने,

 त्यांच्या संपतीत अतिक्रमण करणे,दिव्यांगास धमकी,मारहाण ईत्यादी कारणामुळे दिव्यांग 

कायदा कलम ९२ नुसार कडक कारवाई केली जात नाही त्यांचे ऊदाहरण रामतिर्थ पोलिस स्टेशन येथे दिव्यांगानी २७ एप्रिल २१ रोजी रितसर निवेदन
 भाऊ व त्यांच्या कुंटुबापासुन जमीनीत अतिक्रमण केल्याची तक्रार तोंडी पाच वेळा भेटून व मोबाईल वर विनंती करून 

पदवीधर दिव्यांगाना न्याय मिळत नसेल तर सर्व सामान्य दिव्यांगाना कधी न्याय मिळेल 

व दिव्यांची कायदा २०१६ कलम ९२ हा कायदा कागदावरच राहाणार काय? 
    

  या कायद्याची कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन देऊन दिव्यांगाना न्याय द्यावा 

जर दिव्यांगाना न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक
 
अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस 

प्रशासन जागे करण्यासाठी सनदशीर मार्गाने दिव्यांग आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ 

नये असे आव्हान नांदेड जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,राजुभाऊ शेरकुरवार, 

गजानन हंबर्डे,राहुल सोनुले,गजानन वंहिदे, ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले