Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समाज बांधवांनी घरात राहूनच साजरी करावी :*:नवनाथ पाटिल सातपुतेकिनवट प्रतिनिधी/ मारोती देवकते


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समाज बांधवांनी घरात राहूनच साजरी करावी :*:नवनाथ पाटिल सातपुते

किनवट प्रतिनिधी/ मारोती देवकते
    

 दरवर्षी आपण समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवते असलेल्या लोकमाता राजमाता 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या  

गावासहीत संपूर्ण महाराष्ट्रातील गावा गावात वाड्या वस्तीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात जयंती ३१ मे रोजी साजरी करत असतो,

 पण गेली 2 वर्ष लॉक डाऊन मुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती लॉक डाऊन मुळे सार्वजनिक सोरुपात साजरी करता येणार नाही, 

मंग अश्या परिस्थितीत महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना नम्र विनंती आहे की 

प्रत्येकाने आप अापल्या  घरात राहूनच जयंती साजरी करावी. कोरोणाचा कहर संपता संपत नाहीये. 

संसर्गजन्य व रुग्ण वाढत असताना घरात राहणे हा संसग्राला रोखण्याचा पर्याय आहे, 

त्यामुळे शासनाने विविध देवस्थाने बंद केली आहेत म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे ला २९६ वी जयंती आपण 

घरातच अती उत्साहाने साजरी करावी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व धनगर समजाच्या आराध्य दैवते आहेत.

 या जयंतीच्या दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावायचे आहेत, 

पोलीस, डॉक्टर, साफसफाई कर्मचारी यांचे स्वागत करायचे आहे, 


ज्याला शक्य होईल त्यांनी मेंढपाळ बांधवांना मदत करून लसीचे महत्व पटून द्यायचे आहे.

असे आवाहन  मल्हार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पाटिल सातपुते  यांनी केले आहे.