किनवट मध्ये फिरते पथकांकडून कोविडची तपासणी.
किनवट (प्रतिनिधी):
कोरोना महामारी रोखण्यासाठी माननीय सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार साहेब यांच्या
आदेशानुसार डॉ. संजय मुरमूरे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते
पथकांकडून कोविडची (आरटीपीसीआर) तपासणी करण्यात आली.
यात नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या पथकामध्ये डॉ. सि.एल.झडते वैद्यकीय अधिकारी,
पी.ए.शिरसाट आरोग्य कर्मचारी,एस.आर. पांडवे लँब टेक्नेशीयन,
एन.टी.वाघाडे न.पा., पि.एन राठोड ए.एस. आय, जि.आर. उपलेंचवार,
श्री.किरण धडेकर वाहन चालक इत्यादींनी आपले कर्तव्य पार पाडले.