खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ; एसडीआरएफ मधून हिंगोली, उमरखेड करिता ५ कोटीचा निधी , मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांचे आश्वासन
--------------------------------------------
किनवट/माहुर : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव विधानसभा
क्षेत्रासाठी आपत्ती व्यस्थापनाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ ) मधून ५
कोटी चा निधी अत्यावश्यक सुविधांसाठी देण्याचे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले .
खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आरोग्य ,शेती , आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा केली .
आपत्ती व्यवस्थापनाकरिता प्रत्येक जिल्हयाकरिता जिल्हा नियोजन अंतर्गत निधी राखीव ठेवलेला असतो त्यामधूनच अत्यावश्यक वेळी खर्च केला जातो .
हिंगोली जिल्ह्याकरिता सुद्धा ३० टक्के निधी राखीव आहे
परंतु जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा इतर जिल्ह्याच्या तुलनेने सक्षम नसल्याने रुग्णांना अनेक
अडचणीचा सामना करावा लागतो .कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयांसोबतच लोकसभा
क्षेत्रातील उमरखेड-महागाव विधानसभा मतदार आरोग्य यंत्रणा मजबूत राहावी या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी कंबर कसली
असून जिल्हा आणि मतदारसंघाला आरोग्याच्या बाबतीत अधिक सक्षम करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीवीर इंजेक्शन, प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा ,
सर्वच तालुका स्तरावर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज कोविड सेंटर ,
त्याकरिता लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यावर बारकाईने लक्ष देऊन उपलब्ध करून दिले आहेत .
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये
खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याकरिता रुग्णवाहिकांची मागणी केली आहे
यावर तात्काळ प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत .
त्याअनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत अतिरिक्त निधी मजूर करण्याची मागणी केली होती .
त्या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्याकरिता
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ )
मधून ५ कोटींचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले .
या भेटी दरम्यान दोन्ही उभयंता मध्ये हिंगोली मतदारसंघातील आरोग्य,शेती,