Ticker

6/recent/ticker-posts

बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील


बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील
-------------------------------------------------------
हिंगोली /नांदेड /यवतमाळ :  बँकांनो खबरदार ! जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा 

सज्जड दम खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत  बँकांना दिला.  

खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही  हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज 

वाटपाबाबत आपली आक्रमक  भूमिका स्पष्ट करतांना खासदार हेमंत पाटील बोलत होते  . 
        

         शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये नेहमीच प्रशासन आणि राष्ट्रीयकृत  बँकांची  उदासीनता दिसून येते . 

त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित रहातो परिणामी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते त्यामुळेच शेतकरी आणखीनच कर्जाच्या 

फेऱ्यात अडकतो . वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो .

 खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेतली आहे. 

 बँकांना निर्देश दिले असून जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक सुद्धा घेतली आहे . 

ते म्हणाले कि,  पीककर्ज वाटपासाठी  केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने काम करत आहेत. 

परंतु जिल्ह्यात असलेल्या  इतर  राष्ट्रीयकृत बँका या केवळ  व्यवसाय करत असून त्यांना शेतकरी सर्व 

सामान्य जनता यांच्याशी काहीही देणंघेणं नाही , शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे उद्धटपणे बोलणे , 

बँकेत प्रवेश  नाकारून अपमान करणे अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या  आहेत. 

त्यामुळेच बँकांनी  वेळीच वागणुकीमध्ये बदल करावा ,शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी , 

कागदपत्रांसाठी थांबवावी असे न केल्यास शिवसेना स्टाईलने बँकांना  उत्तर देण्यात येईल असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. 

शेतकरी प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका वेळोवेळी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे . 

कोरोनाच्या काळात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे त्यातच बँकांच्या मनमानी कारभारामुळे  शेतकरी वैतागला आहे  .