Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : उपविभागीय अधिकारी कार्यालय व लघु पाटबंधारे जि. प उपविभाग किनवट व्दारे दिनांक किनवट व माहूर तालुक्यातील सिंचन तलाव, पाझर तलाव व मा. मा.तलाव यांचे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्था मार्फत तलावातील गाळ


किनवट : उपविभागीय अधिकारी कार्यालय व लघु पाटबंधारे जि. प उपविभाग किनवट व्दारे दिनांक किनवट व माहूर तालुक्यातील सिंचन तलाव, 

पाझर तलाव व मा. मा.तलाव यांचे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्था मार्फत तलावातील गाळ उपसा करण्यासाठी दिनांक 09 एप्रिल 2021 रोजी एका पत्रकाव्दारे आवाहन करण्यात आले होते. 

परंतु या यावेळी केलेल्या आहवानात मौजे राजगड येथील तलावाचा समावेश करण्यात आला नव्हता . 
त्यामुळे परिसरातील शेतकरी व सारखानी फार्मर 

प्रोड्युसर कंपनी या स्वयंसेवी संस्थांनी ही बाब सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच पुजार (भा.प्र. से) यांच्या निदर्शनास आणून दिली. 

त्यावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी श्री पुजार यांनी 

मौजे राजगड येथील तलावाला भेट दिली यावेळी त्याठिकाणी वाहन जात नसल्याने त्यांना पायी चालत जावे लागले तरी त्यांनी कशाचीच तमा न 

बाळगता पायी जाऊन सदर तलावाची स्थिती पाहून त्यातील गाळ उपसा करण्याकरिता 

आखण्यात आलेल्या योजनेत सदर तलावाचा समावेश करून पुढील करावाई तात्काळ सुरू केली आहे. 
यावेळी त्यांच्या सोबत उपअभियंता कलवले , 

एस एस पाटेगावकर व परिसरातील शेतकरी व सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी चे समभागधारक उपस्थित होते.

 तर सहाययक जिल्हाधिकारी श्री पुजार साहेबांनी दाखवलेल्या तात्परते बद्दल येथील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.