Ticker

6/recent/ticker-posts

*खामगांव कृ.ऊ. बाजार समितीने सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी दिले पंधरा लाख* *मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या मागणीला यश*


खामगांव कृ.ऊ. बाजार समितीने  सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी दिले पंधरा लाख*
 *मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या मागणीला यश*
जगभरात मागील वर्षापासून कोरोणा या महामारी ने थैमान घातले आहे या रोगामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागत आहे 

तसेच अनेकांना आपल्या घरातील व्यक्तीला व जिवा  भावाच्या नातेवाईकाला कोरोना रोगाची लक्षणे आढळल्यास 

त्या रुग्णाला दवाखान्यात उपचाराकरिता कुठेही बेड उपलब्ध होत नाही अनेक हॉस्पिटल कोरोना पेशंटमुळे खचाखच भरले आहे

 कुठेही बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचे मृत्यू होत आहे हे जवळून पाहील्यावर आपन काही तरी केले पाहिजे असे मनाशी ठरवत 

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नापैकी 25% रक्कम खर्च करून तात्काळ सर्व सुविधा असलेले कोविड सेंटर खोलण्याची 

मागनी सहकार सरचिटणीस शॅडो कॅबिनेट मंत्री मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी केली होती तसेच मागणी करून न थांबता  संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला 

तसेच बुलढाणा जिल्हा चे पालक मंत्री  राजेंद्र शिंगणे साहेबांना मुंबई येथे दोन वेळा भेटून  पाठपुरावा केला 

आनी  आठ ते दहा दिवसातच यश मिळाले परंतु अनुभवी डॉक्टर आणि स्टॉप  उपलब्ध होत नसल्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न 

बाजार समितीने सामान्य रुग्णालय खामगाव यांना खालील साहित्य विकत घेण्याकरिता १५ लाख 35 हजार रुपये देण्याचे ठरवले आहे त्यामधून  

(1) Full fowler ICU bed 10
(2) Bio Medimax Multipara  Monitor (

3) Bed side locker 10
 हे साहित्य लवकरच  उपलब्ध होऊन सामान्य रुग्णालयात बेड ची संख्याही वाढणार आहे  

त्यामुळे आता अनेक कोरोणा रुग्णांचा चांगल्या पद्धतीने उपचार होईल व नागरिकांना त्यांच्या रुग्णांकरिता बेड साठी होत 

असलेली धावपळ कमी होईल तसेच अजूनही सामान्य रुग्णालयास 

कोरोनाच्या तिसर्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी आनी कोरोणा पेशंटचा जीव वाचविण्याकरिता जे काही मदत लागेल

 ते खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून मिळवून देण्याकरीता नेहमीच प्रयत्नशील राहणार  


असेही लोखंडकार यांनी सांगितले तसेच  पालकमंत्री श्री राजेंद्र शिंगणे साहेब ,पणन संचालक श्री सतीश सोनी , 

जिल्हाधिकारी श्री राममूर्ती ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्री प्रशांत पाटील , 

जिल्हा उपनिबंधक श्री राठोड, निवासी वैद्यकीय अधीक्षक श्री निलेश टापरे 

,कृ. उ. बा. समिती प्रशासक श्री महेश कृपलानी,

सचीव श्री भिसे यांनी सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य विकत घेण्याकरिता त्वरित प्रस्ताव तयार केला व तप्तरता दाखवत प्रयत्न केले

 त्यामुळे सर्वांचे आभार मानत विठ्ठल लोखंडकार यांनी धन्यवाद दिले 

*चौकट*

 *लोखंडकार यांची मागणी अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिगंणे यांनी मान्य करत  जिल्हाधिकारी  ,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा उपनिबंधक, 

निवासी वैद्यकीय अधीक्षक खामगांव ,कृ.उ.बाजार समिती प्रशासक,सचीव यांना 

सूचना करत त्वरित प्रस्ताव तयार करून पणन संचालक यांच्या कडे पाठवण्याचे आदेश दिले

 नी सुद्धा त्वरित तप्तरता दाखवत प्रस्ताव तयार करत पणन संचालक यांच्या कडे पाठवला 

व तो प्रस्ताव पणन संचालक सतीश सोनी यांना भेटून लोखंडकार यांनी पास करवून घेतला 

यामुळे आता सामान्य रुग्णालयात आणखीन १० आय सी यु बेड उपलब्ध होणार आहेत 

व अनेक कोरोना पेशंटचा चांगल्या पद्धतीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचेल