माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या निवासस्थानी जाऊन मातोश्रींचा घेतला आशीर्वाद!
मा. सुभाष वानखेडे साहेब आमदार असतांना - मी शाखाप्रमुख, नगरसेवक, विद्यार्थीसेना, जिल्हाप्रमुख होतो.
पुढे दोघांनी हिंगोली लोकसभेत एकमेकांच्या विरोधात लढलो,
यात मला विक्रमी मताधिक्य मिळाले आणि खासदार झाललो.
निवडणूक काळात गुरु-शिष्यात खूप शाब्दिक चकमकी झडल्या पण निवडणूक संपली आणि वातावरण पूर्वपदावर आले.
हदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या गावी ल्याहरी येथे गेलो.
तेथे मातोश्री कमलाबाई बापूराव वानखेडे (वय वर्ष ८५) यांची भेट घेतली,
त्यांचा आशीर्वाद घेतला व जुन्या आठवणीला या भेटीत उजाळा मिळाला.