Ticker

6/recent/ticker-posts

उपक्रमशील , आदर्श शिक्षक , विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी म्हणुन परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गोपाल कन्नाके यांनी कडक लॉक डाऊन मध्ये हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची होणारी उपासमार लक्षात घेऊन मांडवी


उपक्रमशील , आदर्श शिक्षक , विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी  म्हणुन परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गोपाल कन्नाके यांनी कडक लॉक डाऊन मध्ये हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची होणारी उपासमार लक्षात घेऊन मांडवी सर्कल मधील 

पिंपळगांव ( सि ) , तलाईगुडा , लिमगुडा , कोलामपौड , मांडवी , 

फुलेनगर , कोलामपौड (मा) पिंपळगांव फाटा , भिलगांव , दरसांगवी इत्यादी गावांतील अनाथ , 

अपंग , विधवा , मजूर , भूमिहीन , दारिद्र्य रेषेतील लाभार्थी ,

 उपेक्षित - दुर्लक्षित वेडसर , अशा एकूण 51कुटुंबांना कोरोनाचे नियम पाळून भेटी देत 

किराणा सामान अन्नपूर्णा एकूण 51 किट , 200 मास्क , 

51 सेनिटायझर स्प्रे देत कोरोनापासुन घ्यावयाची काळजी सांगत वेळोवेळी  स्वच्छ हात धुण्याचे  महत्व पटवुन देत होते.
      

     तद्नंतर मांडवी येथील कोविड हॉस्पिटल सेंटरला भेट देत येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी हितगुज करत कोरोना योद्धे म्हणुन

 उल्लेखनीय कामाबद्दल संपुर्ण हॉस्पिटल स्टॉपचे ऋण व्यक्त करत 100 मास्क व दहा लिटर सेनिटायझर भेट दिले आहेत.
        

 अशा प्रकारे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी  विविध मानवतावादी उपक्रम घेत गरजूना मदत करत गोपाल कन्नाके यांनी वाढदिवस साजरा केले आहेत.

 यावेळी त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य , मित्र मंडळी उपस्थित होते.