Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली आरोग्य विभागातील २९६ पदांना पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये समावेशित करा - खासदार हेमंत पाटील


हिंगोली आरोग्य विभागातील २९६ पदांना पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये समावेशित करा - खासदार हेमंत पाटील
------------------------------------------------------------
हिंगोली :कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  हिंगोली जिल्हा परिषद  अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील नवीन २९६ पदांना 

पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये समावेशित करण्याची मागणी खासदार  हेमंत पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे . 
                

     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याकरिता  हिंगोली लोकसभा मतदार संघ आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील 

आरोग्य  यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, याकरिता आरोग्य विभागात औषध पुरवठा , रुग्णवाहिका , 

आणि कर्मचारी भरती बाबत  खासदार हेमंत पाटील यांनी प्रामुख्याने लक्ष दिले आहे 

त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील २९६ पदांना तात्काळ पंचायतराज सेवार्थ 

प्रणालीमध्ये समावेशित करण्यात यावे अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे .

यामध्ये आरोग्य विभाग , जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक ( पुरुष) ५४ , आरोग्य सेवक (महिला ) ६९ , अर्धवेळ स्त्री परिचर १३९ , 

औषध निर्माण अधिकारी ०१, आरोग्य सहाय्यीका ०१, कनिष्ठ सहाय्यक, ०१ वाहन चालक ०१, परिचर ०४  

आणि सफाई कामगारांची २५  अशी एकूण २९६ पदे या प्रणाली अंतर्गत समावेशित करावयाची आहे . 


सद्य स्थितीमध्ये आरोग्य सेवक पुरुष पदांमधून ५४ पैकी केवळ १० पदे आणि स्त्री परिचर संवर्गातील १३९ पैकी ७९ पदे भरण्यात आली असून त्यांना ऑफलाईन पद्धतीने वेतन अदा करण्यात येत आहे .

 प्रणालीमध्ये या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर त्यांना शासकीय नियमानुसार सेवाशर्ती लागू होतील. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली मतदारसंघातील तालुक्यांतील  ग्रामीण रुग्णालय . प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोविड सेंटरची पाहणी केली आहे , 

दरम्यान त्यांना बऱ्याच ठिकाणी  सुविधांचा अभाव आढळून आला.

 ज्या ठिकाणी सुविधा नसतील किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे  त्या ठिकाणी तात्काळ  सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते .

 त्यानुसार कार्याला गती आली असून आवश्यक त्याठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. 

कर्मचाऱ्यांअभावी रुग्णाचे हल होऊ नये याकडे खासदार हेमंत पाटील यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे .