खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यातील १०७ कोटींचा पीकविमा मंजूर
----------------------------------------------------------
हिंगोली :मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरलेल्या पिकविम्याच्या रक्कमेपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात १०७ कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे .
सलग दोन वर्ष हिंगोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाला असून गत वर्षी १२४ कोटीचा पीकविमा मिळाला होता.
खासदार हेमंत पाटील यांनी सलग दोन्ही वर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंबंधी पाठपुरावा करून पीकविमा मंजूर करून घेतला आहे .
मागच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पेरणी आणि काढणीच्या वेळी अतोनात नुकसान झाले होते .
त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला .
मागील हंगामात हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आणि शासनाने मिळून ९५ कोटी रुपये भरले आहेत
यामध्ये थेट शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३ कोटी १८ लाख , केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख तर राज्य शासनाने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख रुपये आहे .
यावरून शेतकऱ्यांना यंदाच्या विम्याच्या रक्कमेपोटी १०७ कोटी रुपये मंजुर झाले आहेत.
एकूण विमा काढणारे शेतकरी ३लाख २ हजार आहेत
त्यापैकी १ लाख २१ हजार लाभार्थी असून आजवर ७० हजार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ६५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत
तर उर्वरित रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे विम्याची रक्कम वाढण्याची शक्यता आहे .
जिल्ह्यात एकूण पिकाचे क्षेत्र ३ लाख ४० हजार हेक्टर आहे तर एकूण लागवडीचे क्षेत्र हे १ लाख ४७ हजार हेक्टर आहे .
हिंगोली जिल्ह्याला पहिल्याच टप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर होण्याची हि पहिलीच वेळ आहे
याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण प केंद्र आणि राज्यस्तवर पाठपुरावा केला होता .
सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद साजरा केला जात आहे . गतवर्षी सुद्ध
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना
१२४ कोटीचा पीकविमा मंजूर झाला होता.काही शेतकऱ्यांना पहिल्यांदाच पीकविमा मंजूर झाल्यामुळे आनंद साजरा केला आहे
तर सलग दोन वर्ष पीकविमा मंजुरीमुळे शेतकरी राजाने
खासदार हेमंत पाटील यांच्या बद्दल आभार व्यक्त करतांना शेतकऱ्यांचे कैवारी असल्याची भावना बोलून दाखविली .
खासदार हेमंत पाटील यांना सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नविषयी तळमळ आहे .
त्यामुळेच ज्या- ज्या वेळी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी , दुष्काळ ,