Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख प्रकाश होळकर यांचे निधनकिनवट : पंचायत समिती अंतर्गत मोहपूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश गंगाराम होळकर


केंद्रप्रमुख प्रकाश होळकर यांचे निधन

किनवट : पंचायत समिती अंतर्गत मोहपूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश गंगाराम होळकर

 (वय 56 वर्षे ) यांचे सोमवार (दि.03 ) रोजी दुपारी 2 वाजता हैद्राबाद 

येथे उपचार सुरु असतांना निधन झाले. 

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे.
          

  ते मित्तभाषी व प्रेमळ स्वभावाचे होते. प्रारंभी त्यांची तबियत खालावल्या नंतर त्यांना देगलूर 

येथील रुग्णालयात दाखल केले होते. 

त्यानंतर संदर्भसेवेसाठी त्यांना  नांदेड येथे हलविले होते. 

येथेही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ हैद्राबाद येथे नेण्यात आले होते. 

तेथेच उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मावळली.

 त्यांचे मूळगाव पिंपळगाव ता. देगलूर येथे मंगळवार (दि.4 ) रोजी सकाळी 7 वाजता 

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.