Ticker

6/recent/ticker-posts

पीकविमा लाभाच्या यादीत माहूर तालुक्यामचा समावेश करावा - खासदार हेमंत पाटील


पीकविमा  लाभाच्या यादीत माहूर तालुक्यामचा समावेश करावा 
- खासदार हेमंत पाटील
-----------------------------------------------------
किनवट /माहूर:  उंबरठा उत्पादकता जास्त आल्याच्या कारणावरून हिंगोली लोकसभा मतदार संघातील माहूर तालुका पीकविमा  लाभाच्या यादी मधुन वगळण्यात आला.  

याबाबत परभणी येथे काल झालेल्या कृषी आढावा बैठकीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी मुद्दा मांडून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे 

यांच्याकडे मागणी करत माहूर तालुक्यासोबतच उमरखेड ,महागाव तालुक्याना सुद्धा लाभ मिळवून द्यावा असेही ते   म्हणाले . 
                 

           परभणी येथे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली  खरीप हंगाम नियोजन तसेच कृषी संलग्न योजनांच्या 

अंमलबजावणी संदर्भात लातूर कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात  आली होती या बैठकीमध्ये  पीकविमा,

  पीककर्ज व खत दरवाढ तसेच इतर शेतकरी प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली . 

पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की  पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असून त्यांच्याकडून पीकविमा  भरून घेत आहेत.
  परंतु शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे पीकविमा   मिळत नाही.

मागील खरीप हंगामात  पीकविमा कंपनीने अमाप नफा कमावला असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे .

 यावर कुठेतरी चाप बसला पाहिजे,  त्याच्यावर नियंत्रण आले पाहिजे,  

प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर पीकविमा कंपनीचे कार्यालय स्थापन करून त्याठिकाणी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्यात आले पाहिजे . 

जेणेंकरून तक्रारदार शेतकऱ्यांना तक्रारी दाखल करता येतील .  

माहूर तालुका हा हिंगोली लोकसभा मतदार संघातील अतिदुर्गम , आदिवासी बहुल भाग आहे या तालुक्यांमध्ये खरीप पिकाची पेरणी मोठ्या  प्रमाणामध्ये होते . 

परंतु यंदाच्या हंगामामध्ये माहूर तालुक्याला पीकविमा  लाभच्या  यादीमधून उंबरठा उत्पन्न हे उत्पादकतेपेक्षा जास्त आल्याचे सांगण्यात येऊन  वगळण्यात आलेले आहे.

  त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. 

 तालुक्यामधून ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीकविमा  कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या त्यांनाच  फक्त म्हणजे केवळ 364 शेतकऱ्यांना 27 लाख एवढ्या  नुकसान भरपाई पोटी पीकविमा मंजूर करण्यात आला आहे .  

त्यामुळे सर्वसमावेशक सार्वजनिक असा  पीकविमा शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही.  

उंबरठा  उत्पादनाच्या अटींमध्ये शिथिलता आणून माहूर तालुक्याचा समावेश करून  शेतकऱ्यांवर अन्यायकारक असलेले निकष रद्द करण्यात यावेत  

आणि शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळवून द्यावा सोबतच मतदारसंघातील उमरखेड, महागाव  आणि हदगाव , 

हिमायतनगर तालुक्यांना सुद्धा पहिला आणि दुसरा हप्ता मिळवून देण्याची मागणी खासदार  हेमंत पाटील  यांनी केली आहे .