Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक आरोग्य केंद्राने सर्पदंश उपचारास सतर्क असावे व प्रसुतीपूर्व आधीच रुग्णालयात भरती करून गरोदरमाता-बाल मृत्यू रोखावे-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे,


प्रत्येक आरोग्य केंद्राने सर्पदंश उपचारास सतर्क असावे व  प्रसुतीपूर्व आधीच रुग्णालयात भरती करून गरोदरमाता-बाल मृत्यू रोखावे
-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, 

किनवट : आगामी पावसाळ्यातील आपत्ती दरम्यान होणारी जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी  मदत, शोध, आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवावी लागेलच,

 परंतु प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर इंजेक्शनसह उपचार व पूर्व क्षेत्रिय सर्वेक्षण करून गरोदरमातेस प्रसुतीपूर्व आधीच रुग्णालयात भरती करून माता-बाल मृत्यू रोखावेत,

 असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांनी केले.
      

   उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवार (दि.२४) रोजी सकाळी ११.०० वाजता "मान्सून पुर्व आढावा बैठकीचा" अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. 

यावेळी तहसिलदार उत्तम कागणे (किनवट ), राकेश गिट्टे (माहूर ), उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, 

गट विकास अधिकारी सुभाष धनवे ( किनवट), युवराज म्हेत्रे (माहूर), गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, 
पोलिस निरीक्षक मारोती थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
     

    दरवर्षी प्रमाणे २०२१ या वर्षीचा मान्सून अंदाज भारतीय हवामान खात्याने प्रसिध्द केलेला असून माहे जूनच्या दुस - या आठवड्यापासुन मान्सूनच्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. 
या पर्जन्यमामुळे अनेकदा वादळ , अतिवृष्टी , पूर, विजा कोसळणे , भुस्खलन , रोगराई परसरणे ,

 गावांचा संपर्क तुटणे , लोकांची व संपत्तीची हानी , रस्ते , पुल , 

बंधारे खरडून जाणे, नागरीकाचे सुरक्षीत स्थळी विस्थापण ई. घटना घडून येतात. 

या दृष्टीकोनातून सर्वच प्रशासकीय यंत्रणेद्वारे स्थानीक व गावस्तरावर पुर्व तयारी करून या बाबी लक्षात घेता, 

आपत्ती पूर्व क्षेत्रीय सर्वेक्षण तथा आपत्ती दरम्यान होणारी जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी तसेच मदत , शोध , 

आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी सदैव तयार व तत्पर राहणे अत्यावश्यक आहे, 

असे सांगून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी इन्सिडेंट कमांडर कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे पुढे असे म्हणाले की, आपलाभाग दाट वनराई, डोंगरझाडीचा आहे. 

त्यामुळे सर्पदंशापासून बचावासाठी आरोग्य यंत्रणेने सर्पदंश इंजेक्शनसह सतर्क राहणे आवश्यक आहे. 


प्राथमिक आरोग्य केंदांतर्गत रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान कोणत्याही एखाद्या दुर्गम गावात सर्पदंश अनुषंगाने मॉकड्रिल घ्यावी. त्यात आपण किती तत्पर आहोत ते दाखवून द्यावे. 

तसेच पूर्व क्षेत्रिय सर्वेक्षण करून गरोदर मातांच्या प्रसुतीच्या संभाव्य तारखेच्या तीन- चार दिवस आधीच प्रसुतीसाठी रुग्णालयात  दाखल करावे. जेणेकरून अतिवृष्टीत , 

चिखलमय रस्त्याने बैलगाडीत गरोदरमातेस रुग्णालयात आणावे लागणे. माता वा नवजात अभ्रक दगावणे असा प्रश्नच उद्भवणार नाही.

 प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य आपत्ती निधीतून मिळालेल्या ऍम्बुलंसचा याकरिताच योग्य वापर करून एकही गरोदर माता व नवजात बालक यांचा प्रसुती दरम्यान मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी.
     
      या बैठकीस किनवट व माहूरचे  भूमिअभिलेख अधिकारी, जि.प.बांधकाम विभाग अभियंता,  

विद्युत वितरण कंपनी उपभियंता, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, 

तालुका कृषी अधिकारी , जि.प.ल.पा.विभाग उपअभियंता, 

नगर परीषद व पंचायत मुख्याधिकारी ,  पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी, 

उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय गोकुदाचे वैद्यकीय अधिक्षक,सर्व मंडळ अधिकारी ,मांडवी, सिंदखेड, ईस्लापूर,

 माहुरचे सहा.पोलिस निरीक्षक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे गजानन हिवाळकर उपस्थित होते.