BREKING NEWS
काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं कोरोनाने निधन
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार,राज्यसभेचे विद्यमान खासदार,अभ्यासू व्यक्तिमत्व राजीवजी सातव यांचे कोरोनाने निधन
काँग्रेसचे खासदार राजीव सातव.
गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं.
सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते.
सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.
मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.
त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं.
त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं.
कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती.
२२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं.