Ticker

6/recent/ticker-posts

#जयमहाराष्ट्र : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील वाढती कोरोना परिस्थिती लक्षात घेता उपाययोजनांचा संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख तथा CMOMaharashtra मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब


#जयमहाराष्ट्र : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील वाढती कोरोना परिस्थिती लक्षात घेता उपाययोजनांचा संदर्भात शिवसेना 

पक्षप्रमुख तथा CMOMaharashtra  मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 

अध्यक्षतेखाली व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना खासदारांची बैठक पार पडली.

हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये #रुगवाहिका अजूनही उपलब्ध नाहीत 

तर त्या उपलब्ध करून द्याव्यात व #रुग्णवाहिका_चालक हे कंत्राटी तत्वावर आहेत 

व त्यांना सहा हजार रुपये पगार आहे तर त्यांना किमान वेतन हे बारा हजार देण्यात यावे 

हे मुद्दे मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यासमोर मांडले.

 

या बैठकीत शिवसेनेचे खासदार तसेच कोविड टास्क फोर्स टीम मधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित उपस्थित होते. 

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय उपाययोजनांचा संदर्भात आयोजित या बैठकीत कोरोना बाधित रूग्णांवरील उपचार तसेच 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या संदर्भात चर्चा करत महत्त्वाचा इतर विषयांवरही चर्चा झाली.

#COVID19 #Maharashtra #shivsena #hingoli