देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे.
परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे.
यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाऊन लावणार का? अशी विचारणा करण्यात येत होती.
त्यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत
एकीकडे अनेक तज्ञ आणि राजकीय नेते करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी पंतप्रधानांना लॉकडाउन
लावण्याचा सल्ला देत असताना निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितलं की, १०
टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि ६० टक्क्यांहून आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या
राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
दुसरीकडे केंद्र सरकार देशात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापासून मागे हटत आहे.
कारण लोकांचे जीव वाचवावेत की इकोनॉमी या द्विधा मनस्थितीत सरकार आहे.
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. जी सर्वात मोठी समस्या आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला आहे.