Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कोलामपोडावार महत्व पटविल्याने 110 वर्षे वयाच्या भीमबाई रामा टेकाम यांनी घेतली कोविड - 19 ची लस


आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी  कोलामपोडावार महत्व पटविल्याने 110 वर्षे वयाच्या भीमबाई रामा टेकाम यांनी घेतली कोविड - 19 ची लस 

किनवट : आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार 

यांनी स्वतः तालुक्यातील कोलामपोडावार जाऊन आदिवासी कोलाम बांधवांना लसीकरणाचे महत्व समजाविले 

अन् 110 वर्षे वयाच्या भीमबाई रामा टेकाम यांच्यासह अनेकांनी कोविड - 19 ची लस घेतली.
        

   लसी विषयी असलेला गैरसमज व अज्ञान यामुळे तालुक्यातील आदिवासी पाड्या -गुड्या वरील नागरिक लस घ्यायला पुढे येईनात. 

याकरिता सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शना खाली तालुका 

आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दररोज एका कोलामपोडावर जाऊन लसीकरण करायचे नियोजन केले. 

परंतु आदिवासी मधील अविकसीत कोलामजमातीचे बांधव लस घ्यायला तयार नसल्याचे समजले.
 त्यावरून बुधवार (दि. 09 ) रोजी सकाळीच आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार

 यांनी स्वतः तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीतील कोलामवस्ती, सोनापूर व घोगरवाडी ग्राम पंचायतीतील शिवशक्तीनगर,

 कोलामपोडावार जाऊन आगामी तिसऱ्या लाटेत कोविड 19 विषाणूपासून सुरक्षित जगायचे असेल 

तर कोविड -19 ची प्रतिबंधात्मक लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे तेथील महिला, पुरुषांना समजावून सांगितले.

 आमदार भीमराव केराम यांनी गोंडी, कोलामी भाषेत लसीचे महत्व पटवून दिले. 

तेव्हा मात्र लस घ्यायला सर्वजन पुढे सरसावले. परिचारिका वंदना उईके व चव्हाण यांनी लस दिली.
       

    या मोहिमेप्रसंगी तहसिलदार अनिता कोलगणे,पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, 

पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, 

बालविकास प्रकल्पाधिकारी प्रफुल्ल बागल, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ.श्रीमती व्यवहारे, डॉ.कविता जाधव,

 मंडळ अधिकारी बुरकुले, गजानन हिवाळकर,  घोगरवाडीचे सरपंच मारोती आत्राम, मांडव्याचे सरपंच कनाके, 

उपसरपंच इरपणवार, गोवर्धन मुंडे, अनिरुद्र केंद्रे, आत्माराम मुंडे, उत्तम कानिंदे,संतोष मऱ्हसकोल्हे 

आदिंसह तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते.