Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती साजरी


छत्रपती शाहू महाराज  यांची 147 वी जयंती साजरी



किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)


लोक राजे शाहू महाराज यांची 147  वी जयंती अखिल भारतीय अपंग 

कामगार संघटनेच्या संपर्क 

कार्यालयात साजरी करण्यात आली.


आरक्षणाचे जनक लोक 
राजा छत्रपती शाहू महाराज 
यांची 147 वी

 जयंती साजरी करण्यात आली असून शाहू महाराजांनी त्यावेळेस दलित महार 

मांग चांभार ढोर यांना सवर्ण कडून हिन वागणूक देण्यात येत होती 

अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहूमहाराजांनी 

1902 मध्ये आपल्या संस्थानांमध्ये आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व बहाल केल्याने 

आज घडीला बहुजनातील 18 अलुतेदार 12बलुतेदार यांच्यासह मुस्लिम बौद्ध व 
85 टक्के समाज हे आपल्या राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसत आहेत 

या अभिवादन कार्यक्रमास अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका

 सचिव राज माहुरकर, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष संतोष अडकिने ,

 सचिव विजय वाघमारे, संभाजी ब्रिगेड चे शिवा पवार, 
सुभेदार मेजर तुकाराम मशिदवार तसेच लिंगांना कोतूरवार हे प्रामुख्याने उपस्थित होते