Ticker

6/recent/ticker-posts

*नांदेड ईथले जेष्ठ पत्रकार श्री विजय जोशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या समोर कोरोना काळात राज्यात 200 हुन अधिक पत्रकाराचा कोरोना विषाणू बाधेमूळे मृत्यू झाल्याची माहिती ठेवली


नांदेड ईथले जेष्ठ पत्रकार श्री विजय जोशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील  यांच्या समोर कोरोना काळात राज्यात 200 हुन अधिक पत्रकाराचा कोरोना विषाणू बाधेमूळे मृत्यू झाल्याची माहिती ठेवली. 

राज्यातील पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी केली 

 मंत्री महोदयांनी याबाबत योग्य तो निर्णय घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांना बोलू असे आश्वासन दिले.  पाटण जिल्हा सातारा 

 येथील पत्रकार मेळाव्यात जयंत पाटील यांनी समारोप भाषणात पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे   अभिवचन  त्यांनी दिल्याची आठवण ही त्यांना करून दिली..

या शिवाय जलसंपदा विभागाकडे निधी अभावी अनेक वृत्तपत्रांची बीले पेंडींग पडली आहेत. 
ती लवकर देण्यात यावीत अशी दुसरी मागणी केली. 

ही मागणी येत्या मंगळवार पर्यत पुर्ण करावी अशी सुचना गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कुलकर्णी यांना केली. 

या विषयी हलगर्जीपणा झाल्यास माझ्याशी संपर्क करावा असे पाटील यांनी सांगितले. 

पाटील यांच्या या निर्णयामुळे सर्व वृत्तपत्रांना त्यांची पेंडींग असलेली बीले मिळतील. 

अशी आशा पल्लवित झाल्या आहेत.

 विजय जोशी हे नेहमी वैयक्तिक हितापेक्षा पत्रकारीता क्षेत्राच्या हितार्थ सक्रिय असतात. 

हे विशेष! विजय जोशी यांना दिर्घ निरोगी आयूष्य लाभो ही शुभेच्छा*