Ticker

6/recent/ticker-posts

*नांदेडजिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.28 जुन 21 ते 2 जुलै 21 पर्यंत थालीनांद आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हाण दिव्यांग स अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचे


*नांदेडजिल्ह्यातील  प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी  शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.28 जुन 21 ते 2 जुलै 21 पर्यंत थालीनांद

 आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हाण दिव्यांग स अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचे आव्हान*

तालुका प्रतिनिधी, 

दिव्यांगांच्या विविध योजना
समाज कल्याण जिल्हा परिषद  विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या  

अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ  मिळावा  म्हणून 

*दिव्यांग मित्र नांदेड* हे अॅप अॅपचे ऑनलाईन उद्घाटन 
राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी साहेब व
यांच्या हस्ते ८ जुलै २०२० ला  करण्यात आले. 
 
  त्यांची  प्रभावी अंमलबजावणी व्हावी व १५ आँगस्ट २० ला लाभार्थी यादी प्रसिद्ध  करण्यात यावे असे

 वेळापञक अकरा महिन्यात तिन वेळा वेळापञक व
लेखी आदेश ग्रामसेवक, 

तलाठी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देऊन 

कनिष्ठ अधिकारी यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगानी दिव्यांग मिञ अँप मध्ये बारा हजार दिव्यांगानी नोंद केली 

पण 742 दिव्यांगाना जि प चा निधी मिळाला हजारो दिव्यांग कामचुकार अधिकारी यांच्यामुळे आपल्या हक्कापासुन वंचित राहात असल्यामुळे 

नांदेड जिल्ह्यातील कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दि 28 जुन 21 ते 2 जुलै 

21 पर्यंत खालील प्रश्ननासाठी ग्रामपंचायत शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय समोर थालीनाद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

दिव्यांगाच्या मागण्या :-- 

1)  दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी 

2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे बाबद

2) पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी

2) ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 

3) दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 

4) दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा 

5) दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाई करावी
   
 अशा आपल्या हक्कासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेत असलेल्या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी 

*थालीनांद* आंदोलन करावे असे आव्हान नांदेड जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, 

राजुभाऊ शेरकुरवार, अर्धापुर ता अध्यक्ष दिंगाबर लोणे, म अध्यक्ष सुभद्राबाई शिंदे, किनवट ता अध्यक्ष संजय श्रीमनवार, 

म अध्यक्ष बालीताई जनगेनवाड, माहुर ता अध्यक्ष प्रेयसिंग चव्हाण, म अध्यक्ष आशा जाधव, 

हदगाव ता अध्यक्ष राहुल सोनूले,हि.नगर ता अध्यक्ष तुकाराम तांडेराव म अध्यक्ष लक्मि शेनेवाड,  

ऊमरी ता अध्यक्ष गजानन वंहिदे. म.अध्यक्ष ताराबाई मठपती, नायगाव ता अध्यक्ष विठ्ठल बेलकर,

 म अध्यक्ष साविञाबाई शिंदे, मुखेड ता अध्यक्षरामकिसन  कांबळे,म.अध्यक्ष योग्यश्वरी बरगे,


देगलुर ता अध्यक्ष अनिल रामशेटवार, म अध्यक्ष यशोदाबाई कांबळे, नांदेड ता अध्यक्ष गजानन हंबर्डे, म अध्यक्ष  सविता नावदे, 

बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, लोहा ता अध्यक्ष शेख हानिफ, 
कंधार ता अध्यक्ष बालाजी राठोड, म अध्यक्ष कांलिदा मोरे, धर्माबाद ता अध्यक्ष बळिराम तोटावाड,

म अध्यक्ष निरजनाबाई रापतवाड, भोकर ता अध्यक्ष शेख अखलाख रामलु मोगरेवार, शंकर मैहञे, संतोष नरवडे ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले.