Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी मुखेड तालुक्या तील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.28 जुन 21 ते रोजी थालीनांद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे यांनी केले


दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी मुखेड तालुक्या तील  प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.28 जुन 21 ते रोजी थालीनांद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे यांनी केले

तालुका प्रतिनिधी, 

समाज कल्याण जिल्हा परिषद  विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना 

अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ  मिळावा  म्हणून  

त्यांची  प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी यांना वेळोवेळी लेखि आदेश देऊन 

दिव्यांगाना न्याय मिळत नसल्याने अनेक वेळा आंदोलने करून न्याय मिळत नसल्याने 

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर* 

यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेत असलेल्या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी . 
*२८ जुन २०२१ रोजी मुखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय समोर थालीनांद आंदोलन* 

करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी साहेब मुखेड, पोलिस निरीक्षक साहेब  
यांना देण्यात आले.

*खालील मागण्या*

1)  दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी 

2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे बाबद
3) पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी

4) ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 

5) दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 

6) दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा 

7) दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाई करावी

 ईतर आपल्या हक्कासाठी कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी मुखेड तालुक्यातील सर्व दिव्यांगानी दि 28 जुन 21 रोजी 

आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर *थालीनांद आंदोलनात* 

आपल्या प्रश्ननासाठी  शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी *थालीनाद आंदोलनात* 
सहभागी व्हावे असे आव्हान मुखेड ता अध्यक्ष रामकिसन कांबळे,हनमंत हेळगिरे, दताञय भाटापुरकर, 

मानसीग वडजे, बाबु फुलारी, 
ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले.