Ticker

6/recent/ticker-posts

किनवट: ईस्लापुर जवळ असलेल्या बुरकुलवाडी येथे दि.31 में रोजी सकाळी साडेदहा ते अकरा च्या दरम्यान एका सेवानिवृत्त सी.आर.पी.फ ने गावातील एका महिलेचा धारधार कत्तीने गळा चिरून खून


 किनवट:  ईस्लापुर जवळ असलेल्या बुरकुलवाडी येथे दि.31 रोजी सकाळी साडेदहा ते अकरा च्या दरम्यान एका सेवानिवृत्त 

सी.आर.पी.फ ने गावातील एका महिलेचा धारधार कत्तीने गळा चिरून खून करून स्वतः इस्लापूर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना घडली आहे. 

बुरकुल वाडी येथील सेवानिवृत्त सी.आर.पी.फ सुरेश धनसिंग राठोड राहणार बुरकुल वाडी 

वय 50 वर्ष याने गावातील बेबीबाई भीमराव चव्हाण वय 45 वर्ष हिचा कत्तीने गळा चिरून खून केला आहे.

 मागील काही दिवसापासून दोघांमध्ये काही कारणावरून मनात राग होता तो राग मनात धरून बेबीबाई चव्हाण हिचा कत्तिनेन गळा चिरून खून केला. 

सदरची घटना दिनांक 31 में
 साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान खून करून आरोपी पोलिस स्टेशन इस्लापूर येथे हजर झाला. 

मयत बेबीबाईचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. 

व्रत लिही पर्यंत आरोपी सुरेश राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
पुढील तपास पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक 

यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी सुशांत किनगे, पो.उप.नि.  योगेश बोधगिरे, जमादार पोटे, बोरकर करीत आहेत.

 या घटनेमुळे इस्लापूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले