किनवट (तालुका प्रतिनिधी) :- मागील दिड ते दोन महिण्यापासुन लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या दुकानांना 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगीची आदेश जिल्हाधिका-यांनी देताच व्यापा-यांनी आळस झटकून आपल्या
दुकानाची साफसफाई करून गि-हाकाना सेवा देण्यास सुरूवात केली आहे. गर्दीने बाजारपेठ पुन्हा फुलून गेली आहे.
सर्वाधिक गर्दी शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रात दिसून आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठयाप्रमाणात रूग्ण संख्या वाढली त्यामुळे ब्रेक द चैन अंतर्गत राज्यशासनाने बाजारपेठेतील गर्दी नियंत्राण आणण्यासाठी टप्टयाटप्याने निर्बंध लादणे सुरू केले
त्यामुळे मागील दोन महिण्यापासुन अत्यअवयश्क सेवा वगळता बहूतांश दुकाने बंद होती
काही व्यवासायीकांनी शासन आदेश जुगारून शेटर बंद दुकान सुरू हा फंडा वापरला त्यापैकी काहींवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचा बडगा उगारत दंडात्मक कार्यवाही केली.
या सर्व घडामोडी होत असतांना आता ज्या जिल्हयात पॉझिटीव्ह 10 टक्के पेक्षा कमी आहे
त्याठिकाणी दुपारी २ वाजेपर्यंत दुकान उघ्डण्याची परवानगी
2 जुन पासुन दिली पण 2 महिण्यापासुन दुकाने बंद असलेल्या व्यापा-यांनी वैतागुन
1 जून रोजीच दुकाने उघडली गर्दी होणार या भीतीने बंदोबस्त् असलेल्या पोलीसांनी व प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले