Ticker

6/recent/ticker-posts

*संचारबंदी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी उदय सिंग चंदेल यांनी गर्दीचा जमाव करून कडक संचारबंदी चे केले उल्लंघन


संचारबंदी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी उदय सिंग चंदेल  यांनी गर्दीचा जमाव करून कडक संचारबंदी चे केले उल्लंघन

देशासह महाराष्ट्रात कोरोना कोव्हीड 19 ने थैमान घातले आहेत याचं पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी  संचारबंदी लागू केली आहे 

खाजगी कार्यक्रम मॉनिटर क्लब दिग्रस येथे काल अंदाजे आठ ते अकरा च्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी उदय सिंह चंदेल यांचा शासकीय कार्यकाळ सेवानिवृत्त होत 

असल्याकारणाने निरोप समारंभाचा कार्यक्रम मॉनिटर क्लब दिग्रस येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला 

एकीकडे पोलीस प्रशासन फळ विक्रेते भाजी विक्रेते चिल्लर विक्रेते व व्यापारी यांना धाकदपट करून गुन्हे दाखल करून दंड ठोठावण्यात आला

 मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना घरचाच आहेर दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे 
मॉनिटर क्लब 3 घंट्याचा कार्यकाळात एकाही नागरिकाच्या तोंडाला मास नव्हते 

सोशल डिस्टन्ससिंग चे कुठलेही प्रकारचे भान  ठेवले नाही तसेच सॅनिटायझर सुद्धा वापरण्यात आले नाही 

 कुठलेही नियम संचार बंदी मध्ये न पाळता पाची पकवान मेजवानी याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते 

एकीकडे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत असतानासुद्धा कार्यवाही होताना दिसून येत नाही 

माञ  दुसरीकडे गरिबावर जाणून-बुजून अन्याय-अत्याचार करण्यासाठी व दंड ठोठावणे साठी हे प्रशासन काम करीत आहे का ? 

असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासन दुतर्फी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची चर्चा होत आहे. 

रक्षण करणारे जर भक्षण करीत असेल तर न्याय तरी कुणाला मागावे अशी जोमाने चर्चा दिग्रस शहरामध्ये होत आहे
 अधिकारी अधिकाऱ्याची पाठराखीण करेल की गुन्हे दाखल करेल याकडे  नागरिकांचे लक्ष लागले आहे 

व मॉनिटर क्लब इंग्लिश स्कूल यांच्यावर गुन्हे दाखल करून दंड वसूल करेल की आर्थिक तडजोड  करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .