Ticker

6/recent/ticker-posts

खोटा गुन्हा दाखल झाल्यावर काय करायचे? ।। अटकपूर्व जामीन कसा घ्याल?।। तुम्ही निर्दोष आहे हे कसे सिद्ध कराल? याबाबत माहिती जाणून घ्या ! किनवट (तालुका प्रतिनिधी ) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो तसेच कामगार, नोकरदार, ग्रहणी


खोटा गुन्हा दाखल झाल्यावर काय करायचे? ।। अटकपूर्व जामीन कसा घ्याल?।। तुम्ही निर्दोष आहे हे कसे सिद्ध कराल? याबाबत  माहिती जाणून घ्या ! 

किनवट (तालुका प्रतिनिधी ) माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो तसेच कामगार, नोकरदार, ग्रहणी, व युवा मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहेत आहे,

 तो वेगळा विषय म्हणजे फौ’जदारी गु’न्हा. हा असा विषय आहे की ज्या वेळेस प्रत्येकाचीच धांदल उडून जाते, 

जेव्हा आपल्यावर एखादा गु’न्हा दाखल होतो आणि त्यातूनही जर खोटा गु’न्हा दाखल झाला असेल तर मनस्ताप वेगळाच होतो आणि त्या मनस्तापातून धांदल उडते आणि या खो’ट्या गु’न्ह्यामुळे कधीकधी आपल्याला अटक होते. 

मित्रांनो पोलिसांना चुकीची माहिती देऊन म्हणजेच इन्वेस्टीगेशन एजन्सीला एखाद्या  फिर्यादीद्वारे चुकीची माहिती दिल्या जाते किंवा घटना गंभीर नसते परंतु तिला गंभीर 

रित्या दाखवले जाते त्यावेळेस आपल्यावर गुन्हा दाखल होत असतो तो खोटा असतो हे फिर्यादीला हे माहित असते पोलिसांना माहीत असते. व आरोपींनाही माहीत असते,  

त्यामुळे  कधीकधी आपल्याला जेलमध्ये राहावं लागतं आणि त्यामुळे आपलं जीवन अक्षरशः बदलून जाते.

 त्यामुळे आपली कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये, समाजामध्ये बदनामी, मानहानी होते त्याला आपण घाबरतो. मित्रांनो, माणूस घा’बरत कशालाच नाही तर बदनामीला जास्त घाबरतो, 

त्यामुळे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जर आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर आपल्याकडे काय मार्ग आहे.

खोटा गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याचे तीन मार्ग उपलब्ध आहेत, त्या मार्गांच्या अपरोक्ष आणखी काही गोष्टी आपल्याला करता येतात, 

त्या गोष्टीवर देखील आपण बोलणार आहे. पहिला मार्ग आहे, 

ज्या वेळेस आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला माहिती मिळेल की आपल्यावर खो’टा गु’न्हा दाखल झाला आहे तेव्हा आपल्याला पो’लीस स्टे’शनमधून फोन येऊ शकतो.

किंवा किंवा कळू शकते किंवा इतर मार्गाने आपल्याला ते माहीत होऊ शकतात तर अशाप्रकारे जर तुम्हाला कळले की तुमच्यावर खो’टा गु’न्हा दाखल झाला आहे

 तर त्या वेळेस तुम्ही काय करावे तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईट 

mahapolice.gov.in वर जा.तिथे जाऊन आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्या वेबसाईटला जाऊन आपण तिथे आपल्या वर काय गुन्हा दाखल झाला आहे हे तपासायचे आहे. 

त्यामध्ये तुम्ही तारखेप्रमाणे किंवा पूर्ण महिन्याचे देखील या F-I-R बघू शकतात या F-I-R मध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे किंवा आपण आपला वकीलाशी बोलणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे.

आपले वकील हे संबंधित कोर्टाशी बोलून आपली FIR ची कॉपी काढून देतील. 

आपल्यावर कोणतीही तक्रार झाली तर त्या त्याची प्रत ही 24 तासाच्या आत त्या न्यायालयात, जिल्हा न्यायालयात पोहोचवावी लागते आणि ती जर नाही पोहोचली तर पोलिसांवर कारवाई होते. 

त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल साशंक राहण्याची गरज नाही.ती प्रत कोर्टात पोचलेली असते.

 त्यामुळे तुम्ही तुमच्या वकिलांची बोला आणि त्याची कॉपी काढून घ्या, या FIR मध्ये तुमच्याबद्दल काय लिहिले आहे ते पहा, तुमच्याबद्दल काय गु’न्हा आहे ते पहा. 

त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत तो गुन्हा सत्र न्यायालय मध्ये चालणार आहे, बिगर जामिनी आहे की जामिनी आहे.

जर एखादा गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा किंवा बिगर जामिनी असेल तर तुम्हाला सेक्शन 4-38 crpc खाली तुम्हाला *अ’टकपूर्व* जामीन घ्यावा लागेल.

 तो जिल्हा न्या’यालयात घ्यावा लागतो, 

परंतु एखादा गुन्हा जामीनकीत असतो म्हणून सोपा असतो, जसे की मारामारी केली, 

शिवीगाळ केली किंवा रस्ता अडवला या प्रकारचा जो गुन्हा असतो यावेळेस तुम्ही आणखी एक मार्ग अवलंबू शकता.

तो म्हणजे आपल्या शहरातल्या तालुका न्यायालयात तुम्ही जाऊन स्वतः हजर राहू शकता आणि कोर्टामध्ये वकीलांतर्फे अर्ज करू शकता की मी न्यायालयामध्ये हजर राहिलेलो आहे, 

आम्हाला ताब्यात घ्या आणि जामीन द्या.(surrender) मित्रांनो तिथेही आपल्याला जागीच जामीन मिळण्याची तरतूद आहे. 

त्यामुळे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर घाबरून जायची गरज नाही. आपल्याकडे कोर्टात हजर राहून जामीन घेण्याची देखील सोय आहे.

जर आपल्यावर एखादा मोठा गुन्हा दाखल झाला आहे 

जो की फसवणुकीचा असेल किंवा इतर काही असेल तर आपल्याला जिल्हा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण तेही प्रक्रिया फार मोठी नाही आहे. आपल्याला जिल्हा न्यायालयात हजर राहून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायचा आहे.

अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल झाल्यावर माननीय न्यायालय तुमच्या पोलीस स्टेशनला एक पत्र काढते की असा असा जामीन पूर्व अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे तर तो जामीन का देऊ नये?

 त्यावेळी ते पोलीस स्टेशन न्यायालयाला अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याचे कारण हे सांगतात आणि सांगतात की जामीन व्हावा की नको व्हावा. बहुतांश पोलिस हे जामीन न होणे यासाठी प्रयत्न करतात कारण तो तसा नियम आहे.

पण त्यातूनही घाबरून जाण्याची गरज नाही कारण पोलिसांचं मत आल्यावर त्यावर सरकारी वकील यांचे मत देतात आणि त्यानंतर आपल्याला बाजू मांडण्याची पुरेपूर संधी मिळते फक्त त्या संधीचा एकदम चांगला उपयोग आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये आपली बाजू मांडल्यावर माननीय न्यायालय आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करू शकते. 

हा झाला पहिला मार्ग.यानंतर जो दुसरा मार्ग आहे तो म्हणजे माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण आपल्यावर झालेला गुन्हा किंवा FIR रद्द होण्यासाठी याचिका दाखल करू शकतो. जिल्हा न्यायालयाची पद्धत आहे त्याचप्रमाणे उच्च न्यायालय देखील तीच पद्धत वापरते जसे की तुमच्या पोलीस स्टेशनला नोटीस पाठवते आणि त्याच्यावर सुनवाई होते, 

जर तुमच्याकडे भक्कम पुरावा असेल तर एक तर तुमचा जामीन मंजूर होऊ शकतो किंवा तुमचा FIR म्हणजे तुमच्या वर झालेली तक्रार रद्द देखील होऊ शकते.तिसरा मार्ग असा आहे

 की तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या तपास अधिकाऱ्याला तुम्ही तुमच्या निर्दोषत्वाचा पुरावा देऊ शकता आणि जर तुम्ही तुमचं निर्दोष असल्याचा पुरावा देऊ शकलात तर ते तपास अधिकारी तुमच्या केस मध्ये crpc 169 चा रिपोर्ट देऊ शकतात किंवा बी फायनल आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ते केस खोटी असल्याचा रिपोर्ट ते देऊ शकतात.

पण त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर घाबरून न जाता सगळ्यात आधी ज्या दिवशी आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्या दिवशी म्हणजेच त्या तारखेला आपण कोठे होतो याचा आपण भान ठेवायचे आहे. 

ज्या ठिकाणी, ज्या वेळी गुन्हा घडला तिथे जर आपण नसेल किंवा त्या शहरातच आपण नाहीये.


एखाद्या सरकारी कामासाठी गेलेलो आहे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे किंवा एखादा दस्तऐवज कार्यालयात गेलेलो आहे, खरेदी खत ऑफिस मध्ये गेलेलो आहे, 

तेव्हा तुम्ही कुठे प्रवास करत असाल तर तुमच्याकडे पेट्रोलची पावती असते, अशावेळी या गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे आणि हा गुन्हा मी केलेला नाही हा पुरावा सादर करायचा आहेकारण त्या शहरातच नव्हतो त्या जागेवर नव्हतो,(plea of alebi )हा डिफेन्स घेताना खूप काळजीपूर्वक घ्यावा लागतो कारण आपण तो बचाव घेतलेला आहे

 तर आपल्याला हे पुरावे सादर करावे लागतात की त्या वेळी मी तिथे नव्हतो तो गुन्हा मी केलेला नाही हा बचाव जर आपण घेतला आणि पुरावा दिला तर कुठलेही न्यायालय आपल्याला शंभर टक्के जामीन देईल, 

त्यामध्ये कुठलीही अडचण राहणार नाही.तर असे आहेत हे तीन मार्ग ज्या मार्गे आपल्याला कोर्टात गुन्हा दाखल झाल्यास जामीन मिळू शकतो. मित्रांनो, 

हे तीन मार्ग सोडून आणखी कोणते मार्ग आहेत का? तर हो. आणखी एक मार्ग आहे, त्याच्या साहाय्याने आपण स्वतः किंवा वकील यांच्या सहाय्याने करू शकतो. 

कधीकधी काय होतो तर गुन्हा घडलेला देखील असतो पण गुन्ह्यांमध्ये जितका आपण जितका गुन्हेगार दाखवला आहे तितका गुन्हा आपण केलेला नसतो किंवा कदाचित सगळे लोक मिळून गुन्हा दाखल आहे आणि आपलं नाव लोकांनी त्यामध्ये ओढलेला आहे.
अशी कधीकधी परिस्थिती असते,

 त्यावेळेस आपल्याला असे सिद्ध करावे लागते की त्या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही किंवा मी तो गुन्हा केलेला नाही आहे तर अशा वेळेस काय करायचे तर तुम्हाला साध्या सोप्या शब्दात लिहायचे आहे की मी या घटनेच्या दिवशी या स्थळी नव्हतो, 

या ठिकाणी नव्हतो, मी अमुक ठिकाणी होतो आणि तो माझा हा पुरावा आहे.अशा प्रकारे आपल्याला एक पत्र लिहायचे आहे आणि ते पत्र आपल्या पोलिस जिल्हा अधीक्षकांना पाठवायचे आहे 

आणि त्यांना पाठवून झाल्यावर आपल्या तालुका पोलिस स्टेशनला किंवा जेथे आपल्या गुन्हा दाखल झाला आहे तिथे पाठवायचे आहे. दुसरा म्हणजे, आपले सरकार या गव्हर्मेंट च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच पत्र अपलोड करू शकता,

 त्याच्यावर कारवाई लवकर होते आणि जेव्हा आपल्या गुन्ह्यावर कारवाई चालू असेल तेव्हा चौकशीसाठी ते पत्र जिथे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्या पोलिस स्टेशनला येईल.

त्यामुळे त्या पोलिसांवर देखील दबाव असेल त्यामुळे आपल्या पत्रावर काहीना काही कारवाई त्यांना करावी लागेल आणि त्या पत्रामध्ये जर आपण व्यवस्थित पुरावा सादर केला असेल तर आपल्या गुन्ह्यामध्ये सोपे जाईल आणि पोलिसांना देखील त्या पत्रावर विचार करता येईल. 

आपण कधीकधी पोलिसांना जाऊन सांगायला किंवा पुराव सांगायला भीती वाटते, त्यामुळे जी प्रक्रिया आहे ते आपल्याकडून पूर्ण होत नाही.

त्यामुळे तुम्ही जर पत्र लिहिले असेल आणि त्याला पुरावा जोडलेला असेल तर त्या गुन्ह्याचा आणि माझा कुठेही संबंध नाही असे आपण सांगू शकतो, 

त्यामुळे आपण दिलेल्या पत्रावर देखील कारवाई होईल आणि शोध घेतला जाईल, त्यामधून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल. 

तर मित्रांनो अशा प्रकारचे काही मार्ग आहेत त्यामुळे आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करू शकता.त्यामुळे मित्रांनो, 

जर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला थोडा वेळ लागेल पण तुम्हाला न्याय नक्की मिळेल. 

परंतु, म्हणून असे करू नका की मी घरीच बसून राहतो आणि मला न्याय मिळेल कारण की घरी बसून राहणाऱ्या कधीच न्याय मिळणार नाही. तुम्हाला तुमचे हात-पाय चालवावे लागतील, तुम्हाला तुमची हालचाल करावी लागेल, 

परंतु तुम्हाला न्याय नक्की मिळेल.आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जर आपण गुन्हा केला नसेल तर आपल्याला न्यायालयामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन 1 दिवसात मिळतो. त्यानंतर आपल्याला मूळ अटक पूर्व जामीन पूर्णपणे मिळतो, त्यामध्ये आपल्याला अटक होत नाही. 

त्यामुळे आता खोटा गुन्हा दाखल झाल्यावर मला अटक होईल म्हणून हात पाय गळून बसण्याची गरज नाही.आपण गुन्हा केला नसेल तर आपल्याला अटक होणार नाही. त्यासाठी न्यायालय आपल्याला हवं ते सुरक्षा देत असतं. 

त्यामुळे आपल्याला कोणतीही अटक होणार नाही याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या घरातील स्त्रिया असतील, लहान मुले असतील किंवा 18 वर्षाखालील मुले असतील, 

त्यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा त्यांना अटक होण्याबद्दल देखील बरेच नियम आहेत. 

त्यांना लवकर अटकपूर्व जामीन मिळतो आपण उच्च न्यायालयात देखील त्याची याचिका दाखल करू शकतो.

आपले तपास अधिकारी आहेत त्यांना सहकार्य करा जे काही कागदपत्रे आहेत त्यांना द्या आणि त्यांना जर वाटलं की आपल्यावर झालेला गुन्हा खोटा गु’न्हा आहे 

तर तो पो’लीस किंवा तपास अधिकारी आपल्यावरचा गुन्हा खोटा असल्याचा रिपोर्ट कोर्टात देऊ शकतो आणि आपल्यावर जी FIR आहे ती रद्द होऊ शकते. त्यामुळे न घाबरता सामोरे जा. आपल्याला न्याय नक्कीच मिळेल. 

सदर लेख हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी मित्राला नोकरदार वर्गाला व वाचकाला समजलाच असेल या लेखकाला मुळातच शंका नाही एकच वेळेस वाचा सोप्या शब्दात लेख मांडण्याचा प्रयत्न केला आहे लवकरच समजेल आणि खोट्या गुन्ह्यात बळी पडलेल्या माझ्या एखाद्या मित्राला मदत होईल हे मात्र खरे आहे. 

सदर लेख हा गुन्हेगार ला गुन्हेगाराप्रमाणे वागवले पाहिजे  सदर लेखाचा बेकायदेशीररित्या उपयोग करून *लोक* *सेवकाची* दिशाभूल केली 

तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते हे गुन्हेगारांनी लक्षात ठेवायला हवे म्हणूनच समाजातील गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणे treate केलं पाहिजे हे आपले अधिनियम सांगतात.

विलास संभाजी सूर्यवंशी किनवट. ता. किनवट जि. नांदेड

मो.९९२२९१००८०