उपकेंद्र कमठाला येथे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात
किनवट प्रतिनिधी/मारोती देवकते
तालुक्यातील कमठाला उपकेंद्र येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
वयोगट १८ ते सर्व वयोगटातील
व्यक्तीसाठी हे लसीकरण चालू आहे.
तरी या लसीकरणास गावातील नागरीकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला.
व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती नी वंचित असणाऱ्या नागरीकांना
आपले लसीकरण करुन घ्यावे असे आव्हान केले.
त्यावेळी उपस्थितसमुदाय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब पवार,
आरोग्य सेविका श्रीमती एम. एम. हिवाळे सिस्टर,
आरोग्य सेविका श्रीमती आर. जी ढोरे सिस्टर,
आरोग्य सेवक श्री एस. डी.पवार सर, गावातील श्री. देवसरकर काका
(तंटामुक्ती समिती अध्यक्ष),
प्रतिष्ठित नागरिक श्री शिवजीराव पाटील तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.