Ticker

6/recent/ticker-posts

किनवट - तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या व लॉकडाऊनच्या काळातही बिनधास्तपणे सुरु असलेल्या इंजेगाव नाक्यावरील मटका बुक्कीवर डीवायएसपी,स्थानिक पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकली


इंजेगावातील मटका अड्ड्यावर धाड                     

  किनवट - तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या व लॉकडाऊनच्या काळातही बिनधास्तपणे सुरु असलेल्या इंजेगाव नाक्यावरील 

मटका बुक्कीवर डीवायएसपी,स्थानिक पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकली.

या धाडीत ३ जुगारी, २ दुचाकी,कांही रक्कम जप्त करण्यात आली.              

 येथील पोलीस ठाण्यातील इंजेगाव नाका बीट जमादाराच्या 'अर्थ 'पूर्ण दुर्लक्षामुळे
 गेल्या कित्येक दिवसांपासून मटका, क्लबसह अवैध दारु विक्री जोमाने सुरु आहे.

लॉकडाऊनच्या काळात डीवायएसपी मंदार नाईक यांच्या पथकाने सदर बुक्कीवर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला होता.

त्यानंतरही इंजेगाव नाक्यावर ओपन,क्लोज मटका व इतर अवैध धंदे सुरूच होते.

शुक्रवारी सायंकाळी डीवायएसपी नाईक यांच्या पथकासह सहायक पोलीस निरीक्षक राहुल भोळ व पोलीस कर्मचाऱ्यांनी बुक्कीवर धाड टाकली.

पोलीस आल्याची कुणकुण लागताच कांही जुगारी फरार झाले.
पथकाने कारवाईत मटका खेळणाऱ्या तसेच खेळविणाऱ्या तिघांसह २ मोटारसायकली,

जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी रात्री उशिरा मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. दप्तरी नोंदीसाठी इंजेगावातील बुक्कीवर धाड पडली असली,
तरी किनवट शहरात मुख्य बुक्कीसह  गल्लीबोळात चालणाऱ्या जुगाराकडे 
नांदेडच्या एलसीबीसह स्थानिक
 पोलिसांचे दुर्लक्ष आहे.