Ticker

6/recent/ticker-posts

*सरपंच, ग्रामसेवक दिव्यांगाच्या आंदोलनाचे निवेदण घेण्यासाठी त्यांना वेळ नसेल तर त्यांच्या सवलती कधी देतील महिला अध्यक्ष बालीताई जनगेनवाड यांचा सवाल*


सरपंच, ग्रामसेवक दिव्यांगाच्या आंदोलनाचे निवेदण घेण्यासाठी त्यांना वेळ नसेल तर त्यांच्या सवलती कधी देतील महिला अध्यक्ष  बालीताई जनगेनवाड यांचा सवाल


 
*दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर*

 यांच्या नेतृत्वाखाली नांदेड  जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेतअसलेल्या  शासन प्रशासनास जागे करण्यासाठी 

 *२८ जुन २०२१ रोजी किनवी तालुक्यातील पळशी ग्रामपंचायत कार्यालय समोर 

*थालीनांद आंदोलनाचे निवेदण स्वीकारण्यासाठी सरपंच ग्रामसेवक उपस्थित न राहिल्याने दिव्यांगाचे प्रश्न कधी सुडतील असा संताप व्यक्त केला*

खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी आपला संताप घोषणेने व्यक्त केला 

1)  दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी 

2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे बाबद

3) पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी

4) ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 

5) दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 

6) दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा 

7) दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाई करावी

    आपल्या हक्कासाठी दिव्यांग बांधव कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी किनवट तालुक्यातील सर्व दिव्यांगानी दि 28 जुन 21 रोजी १५ गावात पहिल्याच दिवशी अनेक गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर *थालीनांद आंदोलन करूण आपला संताप व्यक्त केला 
 

*थालीनाद आंदोलनात* दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र किनवट 

ता.महिला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, म.ता, सचिव मनिषा गारपेलवार,करिष्मा पुरके, वंदना सोनुले, कौशल्य मडावी,

सुनिता जाधव, प्रणव कनाके, सम्यक पाटिल, संतोष गोकनवाड, दिनेश वागुलवार

ईत्यादी कार्यकर्त्यांनी थालीनांद आंदोलन यशस्वी केले. तर मांडवी पोलिस संरक्षण बंदोबस्त केला असे प्रसिध्दी पञक दिले