Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी - किनवट शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या ओपन क्लोज मटका मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून चालू असलेल्या मटका जुआ क्लब तात्काळ बंद करावा अन्यथा आठ दिवसानंतर जन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष येलचलवार


किनवट/प्रतिनिधी - किनवट शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या ओपन क्लोज मटका मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून चालू असलेल्या मटका जुआ क्लब तात्काळ बंद करावा अन्यथा आठ दिवसानंतर जन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष येलचलवार 

यांनी स्थानिक पोलिस प्रशासनासह वरिष्ठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
           
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शिवसेनेच्या वतीने 

किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांना निवेदन देण्यात आले, 

यावेळी तालुका संघटक व्यंकट भंडारवार, 

दिशा समितीचे सदस्य मारुती सुंकलवाड,

 युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख प्रशांत कोरडे,

 युवा सेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे, उपशहर प्रमुख राकेश गणोजवार, उपस्थित होते.
           
  किनवट पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, 

किनवट शहरातील साठेनगर, बस स्टैंड, भाजी मार्केट, 

रामनगर, बाबा रमजान, धोबी गल्ली, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन परिसर,
 
गंगानगर, गोकुंदा कपास जिनिग 
जुआ क्लब चालू अस्लया बदल 

यासह अन्य ठिकाणी ओपन क्लोज मटका खुलेआम व जोमाने चालू आहे. 

एवढेच नाही तर तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील इंजेगाव फाटा याठिकाणी 

एका धाब्यावर विदर्भातील पांढरकवडा येथील मटकाकिंग ने पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घातला आहे.
          

  या मटक्यामुळे असंख्य गरीब कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. 

मजुरी करणारे मजूर वर्ग, दररोजची कमाई मटका लावून कंगाल होत आहेत. 

भाजीपाला विक्रेते, मिस्त्री काम करणारे, नोकर वर्ग, रेतीवाले, 

जेमतेम नोकरवर्ग आपली पगार कमाई मटका मध्ये उडवून नराश्य होत आहेत. 

त्याच मानसिकतेमध्ये दारू पिऊन 
घरी हैदोस घालत आहेत.

 मटका खेळणाऱ्यांची अनेक घरातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

खरे मटका चालविणारे व मटका चालविण्यात सहकार्य करणारेच पैसा कमवत आहेत. 
तर मटका लावणारे सर्वच बरबाद होत आहेत.
            
    स्थानिक पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व मुजोरीने शहरासह तालुक्यात चालत असलेले मटक्याचे अड्डे 

तात्काळ बंद करावा आणि मटका चालवणाऱ्या मटकाकिंग चा कायमचा बंदोबस्त करावा. 

अन्यथा आठ दिवसानंतर किनवट शिवसेनेच्यावतीने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.