Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि ०४ शहरातील कॅनरा बॅक ची शाखा मागील एका आठवड्यापासुन सलग इंटरनेट बंद असल्याचे कारण सांगत बंद कामकाज बंद असल्याने ऐन पेरणीच्या काळात शेतक-यांसह, सर्वसामान्य व्यापारी व नागरीकांची आर्थिक कोंडी झाली आहे


किनवट ता.प्र दि ०४ शहरातील कॅनरा बॅक ची शाखा मागील एका आठवड्यापासुन सलग इंटरनेट बंद असल्याचे कारण सांगत बंद कामकाज बंद असल्याने ऐन पेरणीच्या काळात शेतक-यांसह, सर्वसामान्य व्यापारी व नागरीकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
    
   किनवट तालुका हा अत्यंत निकृष्ठ दर्जाची बॅकींग सुविधे करिता ओळखला जातो तर येथिल भारतीय स्टेट बॅक, कॅनरा बॅक,

 अक्सिस बॅक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक यांच्या शाखा किनवट येथे आहे 

या किनवट तालुक्यातील प्रमुख बॅका आहे परंतु या बॅकांमध्ये सर्वात जास्त वाया गेलेले, अप्रशिक्षित, 

अज्ञानी व उध्दट कर्मचारी हे किनवट येथिल शाखेत शिक्षा म्हणून पाठवले जातात कारण किनवट तालुक्यातील नागरीक हे सृजनशील,

 सहनशील व समजुतदार असुन अशा वायागेलेल्या कर्मचा-यांना सहन करतात म्हणुन विविध बॅकांह्या त्यांच्या सर्वात निकृष्ठ दर्जाच्या कर्मचा-यांना 

किनवट तालुक्यात पाठवतात ज्यांना माहिती तंत्रज्ञाना विषयी काहीच माहिती नसते, 

बॅकेकडुन ग्राहकांना पुरवण्यात आलेल्या सुविधा देखिल हे वायागेलेले कर्मचारी ग्राहकांना सुरु करुन देऊ शकत नाही 

अशा कर्मचा-यांमुळे किनवट तालुक्यातील बॅकींग व्यवस्था नुसती कोलमंडली आहे यात लवकरच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सुधारना करण्याची गरज आहे.

   
    इंटरनेट हे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक बाब बनले असुन कोणतेही काम त्या शिवाय होत नाही अशा स्थितीत जर रस्त्याचे काम होत

 असेल किंवा त्यात कोणताही बिघाड होत असेल तरी भारतीय दुरसंचार विभाग

 व संबधित इंटरनेट पुरवठादार कंपन्यांनी इंटरनेट ची सुविधा प्राथमिकतेने पुरवली पाहिजे व त्याला 

दुरुस्त करण्यासंबधी विशेष पाउले उचलली गेली पाहिजे परंतु किनवट तालुका हा जिल्ह्याच्या ठीकाणापासुन १६० कि. मी. 

एवढ्या लांब अतंतरावर असल्याने कोणत्याही जिल्हा प्रशासनातील अधिका-यांचे इकडे लक्ष जात नाही 

त्यामुळे मागील एका आठवड्यापासुन बि.एस.एन.एल ची इंटरनेट सेवा बंद आहे 
त्यामुळे शहरातील एक- दोन बॅका सोडुन इतर सर्व प्रमुख व महत्वाच्या बॅका बंद आहेत. 

त्यामुळे लॉकडाऊन मुळे कंबरडे मोडलेले व्यापारी व नागरीक या इंटरनेत मुळे अजुन हैरान झाले आहे त्याकडे संबधित लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.