Ticker

6/recent/ticker-posts

प्राणवायूच्या गरजेसाठी पंचायत समिती किनवट कार्यालय परिसरात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ


प्राणवायूच्या गरजेसाठी पंचायत समिती किनवट कार्यालय परिसरात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

किनवट : कोरोनाने प्रत्येकव्यक्ती गतवर्षापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली त्यावरून आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. याकरिता शासनाच्या वृक्षलागवडीच्या धोरणानुसार 

शनिवार (दि.05 जून) रोजी येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात  जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने जिल्हा परिषद,

 नांदेडचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले यांचे हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले.
     

    मानवी जीवनात आपल्या भोवतालाचे असलेले हे महत्व लक्षात घेऊन , प्राणवायुची गरज लक्षात घेऊन , 

निसर्गाच्या शुद्धतेची गरज लक्षात घेऊन या जागतिक पर्यावरण दिनापासून शासनाने 

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनी अर्थात पाच जून पासून या मोहिमेचा शुभारंभ केला जात आहे .

 हाती घेतली आहे .
 औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर ,

 नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर ,

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यात अधिकाधिक लोकसहभाग द्यावा , 

असे आवाहन नांदेड जिल्हावासियांना केले आहे . 

त्याच अनुषंगाने गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी पंचायत समिती परिसरात जागतिक पर्यावरण दिनी अर्थात पाच जून रोजी या मोहिमेचा शुभारंभ वृक्षारोपण कार्यकमाचे आयोजन करून केला.
      
   यावेळी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, माजी उप सभापती तथा विद्यमान सदस्य गजानन कोल्हे पाटील , 

गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, 

पशुधन विकास अधिकारी डॉ. सायन्ना आडपोड, 

लेखाधिकारी अरुण संकनेनीवार, 
कृषी अधिकारी संजय घुमटकर, 

विस्तार अधिकारी एस.एन.शिंदे, चिंतावार, आरोग्य विभागाचे एस.टी. राठोड,
 तांत्रिक सहायक सचिन येरेकार, मदने, पत्रकार गोकुळ भवरे, उत्तम कानिंदे 

आदिंसह कार्यालयीन सर्व स्त्री -पुरुष अधिकारी व कर्मचारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
    

      कृषीदिना निमित्त 1 जुलै 2020 रोजी पंचायत समिती किनवट प्रांगणात मियावाकी प्रकल्पांतर्गत लावलेले 300 वृक्ष 

आज डौलाने हलत ऑक्सिजन प्रसवित आहेत. या हिरवाईचे सर्व मान्यवर कौतुक करीत आहेत.


" विविध संकल्पनांचा सदर वृक्षलागवड करतांना वापर करता येईल .

 यात घनवन लागवड म्हणजेच कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांची लागवड , गाव तेथे देवराई म्हणजेच देवस्थान परिसरामध्ये धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या वृक्षांचे वन तयार करता येईल . 

रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सार्वजनिक विहिरींच्या सभोवती वृक्ष लागवड , स्मृती वनांची निर्मिती , नदी - नाले यांच्या काठावर बांबु लागवड आदी उपक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाने सचविले आहेत.

 त्याची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात येईल. 
तसेच 1 जुलै 2021 कृषीदिनी पंचायत समितीच्या दर्शनी कोपऱ्यात घनवन वृक्षलागवड करण्यात येईल.
सुभाष धनवे, गट विकास अधिकारी