किनवट ता.प्र दि ०४ राज्य शासन ९०० कोटी रुपये खर्च करुन मुंबई येथे तिसरे आमदार निवास उभारत आहे परंतु राज्याच्या बिकट परिस्थितीत राज्याची कायदा व सुरक्षा सांभाळणा-या पोलिसांना राहण्यास राज्यात घरे नसल्याने ते अत्यंत त्रासदायक
परिस्थितीत राहत आहेत तर राज्य शासनाने आवश्यकता नसलेल्या ठीकाणी खर्च करण्या एवजी आवश्यक त्या ठीकाणी खर्च करावा
अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटानेच्या नांदेड जिल्हा शाखे तर्फे रितेश कनाके
यांच्या मार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना देण्यात आले आहे.
राज्याला कोरोना सारख्या अवघड परिस्थितीत व कोणत्याही संकटासमयी आपले कर्तव्य बजावत खंबीरपणे साथ देणा-या पोलिसांना कोणत्याही
गृहनिर्माण संस्थेकडुन, बॅकांकडुन घर बांधण्याकरिता वित्तीय सहायत्ता प्राप्त होत नाही
अशा स्थितीत शासनाने पोलिसांना घरे बांधकाम करण्यासाठी सहाय्यता उपलब्ध करुन दिली पाहिजे
किंवा पोलिसांकरिता असलेले क्वॉर्टर्स ची दैना अवस्था सुधारली गेली पाहिजे
त्यामुळे राज्यातील पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या घरात राहता येईल
परंतु राज्य शासन पोलिसांच्या या मुलभुत गरजा दुर करण्या एवजी अनावश्यक बाबी कडे खर्च करत आहेत
सुमारे ९०० कोटी रुपये खर्च करुन मनोरा आमदार निवास उभारण्यात येत आहे
ज्याची काहीच आवश्यकता आजच्या स्थितीत राज्याला नाही
परंतु सरकार ने स्वतः मुल्यमापन करुन योग्य धोरण अमलात आणावे
अशा आशयाचे निवेदन पोलिस बॉइज संघटने तर्फे नांदेड जिल्हा सचिव रितेश कनाके यांच्या नेत्रुत्वात देण्यात आले