Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तेलंगाना सिमे जवळील परंतु किनवट तालुक्यातील इंजेगांवफाटा येथे कोरोनाच्या लाॅकडाऊन काळातही संचारबंदी व जमावबंदीचे निर्देश पायदळी तुडवत मटका व्यवसाय चालूच आहे


किनवट  तेलंगाना सिमे जवळील परंतु किनवट तालुक्यातील इंजेगांवफाटा येथे कोरोनाच्या लाॅकडाऊन काळातही संचारबंदी व जमावबंदीचे निर्देश पायदळी तुडवत मटका व्यवसाय चालूच आहे. 

तेलंगाणातील बोथ पोलीसांनी याच अड्यावर धाड घालून ९२ हजार रोख रक्कमेसह अशोक मोहनलाल आणि संजय व्यास यांना जेरबंद केले होते. 

कोरोनाचे थैमान घातले असतांना देखिल शेकडों दुचाकी व चारचाकी वाहनासह जमाव जमतो, 

तेंव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्त कार्यवाही करुन 

अड्डे उध्वस्त करावित, अशी जनसामान्यांची मागणी तर आहेच शिवाय काळाची गरज सुद्धा आहे.
           
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट पासून केवळ २० कि.मी.अंतरावर तेलंगाणा राज्याच्या सिमेलगत 

इंजेगांवफाटा आहे. 

या फाट्यावर एक नावालाच धाबा आहे. 

या धाब्यावर विदर्भातील पांढरकवडा येथील 
मशहूर मटकाकिंग अशोक मोहनलाल 

आणि संजय व्यास हे या ठिकाणी खुलेआम जोमात बिनबोभाट मटका चालवतात. 

शेकडो लोकांचा जमाव जमतो. आणि पैशाचा महापूर वाहतो. विशेष म्हणजे किनवट पोलिसांना लक्ष्मी दर्शनामुळे जे करता आले नाही

 ते तेलंगानातील बोथ पोलिसांनी किनवट पोलिसांच्या हद्दीत असलेल्या

 या मटका अड्ड्यावर धाड टाकून जवळपास
 ९२ हजार ६९० रोख रकमेसह वरील मटका चालकांना अटक करून जेरबंद केले होते.

 हे विशेष म्हणावे लागेल.
           
     सदर क्षेत्र तेलंगाना हद्दीत नसताना बोथ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई नंतर केवळ दोन दिवस हा मटका अड्डा बंद होता.

 पुन्हा त्याच जोमाने येथील मटका सुरू झाला. 

 पुन्हा त्याच जोमाने येथील अड्डा चालू झाला असून

 तेलंगाणातील बोथ तालुका आणि किनवट तालुक्यातील मटका खेळणाऱ्या लोकांची चिक्कार गर्दी जमत आहे.

 सद्या कोरोनाची परिस्थिती पहाता कोरोनाचा प्रसार करणारा हा अड्डा प्रमूख केंद्र बणू शकते कारण तेलंगाणातही कोरोनाचे थैमान आहे. येथे कोरोना कायद्याचे उलंघन केले जात असल्याने

 सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 

 मटकाअड्डा बंद करणे काळाची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.
         
         अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुवव्यवस्था अबाधित ठेवण्याचे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र याच कर्तव्यात कसूर होत आहे. 

मटका, जुगार याकडे होणारे किनवट पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि अर्थपूर्ण वाटाघाटींमुळेच तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. 

नागरिकांच्या तक्रारींनंतरही अवैध धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना छुपे संरक्षण देण्याचेच काम पोलिसांकडून सुरू असल्याची शंका अड्डे चालू असल्यामुळे येत आहे. 

कोरोनाच्या कायद्याचे पालन करण्याची सक्ती फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे काय ?
त्यातून अवैध धंदेवाल्यांना मुभा दिली काय ? याचा तरी संबंधित प्रशासनाने खुलासा करावा, अशीही मागणी होत आहे.