दिव्यांग कायद्याचा शासन प्रशासनाने अंमलबजावणी करतील काय दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
दिव्यांग व्यक्तींना इतरां प्रमाणे मानवी हक्कांचा समानतेने उपभोग घेता यावा,
म्हणून भारत सरकारने २८ डिसेंबर २०१६ पासून *दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा*
अंमलात आणला आहे.समाजातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग ,
मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त
दिव्यांग व्यक्तींना जीवनाच्या सर्वांगीण समान संधी उपलब्ध व्हाव्यात,दिव्यांगांना संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे,
या उद्देशाने शासन स्तरावरून समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
दिव्यांगांनाही इतरांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून असंख्य शासकीय योजना आहेत.परंतु त्यांच्यापर्यंत त्या पोचत नसल्याने दररोजच त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
दररोज रेल्वे, बसस्थानक
तसेच शहरांमध्ये भीक्षा मागून हे दिव्यांग दिवस काढत आहेत.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत
असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे.
यामुळे मोजक्याच दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.
विशेष म्हणजे केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली.नऊ वरून २१ प्रवर्ग केले आहेत.
मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.
दिव्यांग व्यक्तींकडे त्यांच्या दिव्यांगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले
सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे
या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे.
या सर्वांचे उद्देश दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे होय.
अशाप्रकारे शासन प्रशासनाने दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करून न्याय देणे गरजेचे असताना शासन प्रशासन जागे करण्यासाठी
सर्व दिव्यांगानी संघटितपणे संघर्ष करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोर पाटिल कुंचेलीकर यांच्या सोबत सर्वानी सहभागी व्हावे
असे आवाहन नांदेड जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष .ज्ञानेश्वर नवले,राजू शेरकुरवार, प्रेमसिंग चव्हाण,
राहुल सोनूले, दिंगाबर लोणे, रामकिसन कांबळे, विठल बेलकर,गजानन हंबर्डे,तुकाराम तांडेराव,
अंकुश खिलारे ,संजय श्रीमनवार,गजानन वंहिदे,