किनवट ता.प्र दि २६ राज्यात आदिवासींच्या गावाचा व वाडीचा विकास व्हावा या उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक १६ जुन २००७ च्या निर्णयान्वये शासनाने ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम योजनेची सुरवात केली
त्यानुसार ज्या गावात व वाडीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या
असलेल्या गावामध्ये सदर योजनेच्या
अंतर्गत विकास कामे होणे अपेक्षित आहे.
परंतु धामनदरी ग्राम पंचायत या गट ग्राम पंचायत मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
यांनी दिनांक २४/०३/२०२१ रोजीच्या आदेशान्वये
धामनदरी या गावात तीन विकास कामे मंजुर केली आहे
त्यात दोन कामे धामनदरी येथे तर एक काम वसवाडी येथे मंजूर आहे
परंतु त्यातील वसवाडी येथे कामे ठक्करबाप्पा योजने अंतर्गत
होऊ शकतात परंतु धामनदरी येथे सदर योजने अंतर्गत कामे होऊ शकत नसल्याने
त्या विरोधात धामनदरी येथिल सामाजिक कार्यकर्ते परसराम आत्राम यांनी निवेदन दिले
असुन धामनदरी या गावात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत मंजुर केलेली
विकास कामे ही आदिवासींच्या गावात वर्ग करण्यात यावी असे त्यांनी दिनांक २२ /०६/२१ रोजी सादर केलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
मराठवाड्यातील एकमेव आदिवासी विधानसभा मतदारसंघातील ठक्कर बाप्पा या आदिवासींकरिताच्या योजने चे
काम आदिवासी गावा व्यतीरिक्त मंजुर करण्यात आल्याने ते काम धामनदारी व्यतीरिक्त
इतर आदिवासी गावामध्ये वर्ग करण्यात यावे अशी मागणी परसराम
आत्राम यांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी,