Ticker

6/recent/ticker-posts

गावातील वाळू, गौण खनिज (मुरूम, खडक, दगड, किंवा माती) उत्खनन/वापराबाबतचे नियम याबाबत उपयुक्त माहिती


गावातील वाळू, गौण खनिज (मुरूम, खडक, दगड, किंवा माती) उत्खनन/वापराबाबतचे नियम याबाबत  उपयुक्त माहिती !*

किनवट(तालुका प्रतिनिधी)
माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच गौणखनिज आपण आपल्याला गरज असेल किंवा 

 आपण तिचा वापर करू शकतो किंवा आपण आपल्या गावातील गौण खनिजाच्या उत्पादन भागा मधून ते काढू शकतो मित्रांनो फार महत्त्वाचा विषय आहे आपल्याला घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे परंतु वाळूचा मिळत नसते,

 मग आपली तकलीफ अजूनच वाढते तर मित्रांनो शासनाने काही असे नियम बनवले  आहेत की तुम्ही तुमचे घर वाळू द्वारे बांधू शकता.ते कसे या ठिकाणी माहिती घेणार आहोत ती गावातील वाळू, 

गौन खनिज याबद्दल. गौण खनिज म्हणजे काय तर मुरूम, खडक, दगड, कंकर किंवा माती. ही जर का शासकीय मालकीची असतील, 

शासकीय मालकीची म्हणजे काय? नदी मधली, नाल्यांमध्ये, तलावांमध्ये किंवा शासकीय जमिनीवरील तर वाळू किंवा गौण खनिज असेल तर,

तुम्हाला कधी तुमच्या उपयोगाकरिता हवे असेल तर ते कशा रीतीने तुम्ही मिळवु शकता? जर कधी तुम्ही शासनाच्या परवानगी शिवाय वाळू असेल किंवा गौण खनिज असेल हे वापरले तर त्या वरती कोणता दंड किंवा किती दंड हा आकारला जातो,


 हे सुद्धा आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत.आज आपण ज्या आधी सूचने बाबत जाणून घेणार आहोत ही अधिसूचना वाळू व गौण खनिज संदर्भा तली आहे.

 ही जी आधी सूचना आहे ही महसूल व वन विभागाने 12 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये प्रकाशित केलेली आहे. याआधी सूचने मध्ये आपण महत्त्व, महत्त्वाचे मुद्दे आहेत

 त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत.गावकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या वापरा साठी वाळू वगळून इतर गौण खनिज काढणे: आता वाळू वगळून इतर गौण खनिजे म्हणजे कोणती, ते म्हणजे मुरूम , खडक , दगड, कंकर माती, इत्यादी.

 या नियमांच्या तरतुदींच्या अधीनतेने तहसीलदारांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन परंतु कोणतीही फी किंवा स्वामित्व धन न आकारता कोणत्या ही गावा तील कोणत्या ही रहिवाशांना त्याच्या घरगुती किंवा 

शेतीच्या प्रयोजनासाठी,विहिरी बांधण्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 22 अन्वये या प्रयोजनार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी अभि हस्तांतर न केलेल्या कोणत्याही आकारणी न केलेल्या 

शासकीय पडीक जमिनी तून किंवा राज्य शासना कडे ज्याचे हक्क नीहीत आहेत अशा कोणत्या ही तळ्यातून दोन ब्रास पेक्षा अधिक नाही एवढे गौण खनिज म्हणजेच माती, दगड,

 खडक किंवा मुरूम इत्यादी काढता येईलअशी लेखी परवानगी असा अर्ज प्राप्त झाल्याच्या या दिनांका पासून पंधरा दिवसाच्या कालावधीच्या आत तहसिलदारा कडून देण्यात येईल. 

परंतु कोणत्याही तळ्या मध्ये त्याच्या काठा वरून पडलेल्या कोणताही दगड काढता येणार नाही आणि अशा तळाच्या बांधाच्या पायापासुन साडेचार मीटर अंतराच्या परिसरात कोणतेही उत्खनन करता येणार नाही.

गावकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी वाळू काढणे: या नियमां च्या तरतुदींच्या अधीनते ने तहसीलदारांची लेखी पूर्व परवानगी घेऊन 

आणि जिल्हाधिकारी यांनी वाळू उत्खनना साठी पर्यावरण अनुमती घेऊन लिलावा साठी निश्चित केलेल्या वाळू घाटा पैकी 

लिलावात यशस्वीरित्या बोली न लावलेल्या वाळू घाटा साठी निर्देशित केलेल्या प्रचलित दरा नुसार स्वामित्व धनाचे प्रदान करून 

कोणत्याहीगावातील कोणत्याही रहिवाशांना त्याच्या घरगुती किंवा शेतीच्या प्रयोजना साठी विहीर बांधण्यास दोन ब्रास पेक्षा अधिक नाही एवढी वाळू काढण्यास परवानगी देईल. 

तहसीलदार वाळू उत्खनना साठी असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांका पासून पंधरा दिवसाच्या कालावधीत अशा प्राप्त अर्जची शाहनिशा करून वाळू उत्खननासाठी निश्चित केलेल्या वाळू 

घाटामधून वालू काढण्यास परवानगी देऊ शकेल. सदर माहिती ही माझ्या शेतकरी वर्गाच्या गरजेची परी पूर्तता करण्यासाठी आहे 

सदर माहिती ने कोणतेही कायद्याच्या भंग करणाऱ्या व्यक्तीने ही माहिती घेऊन तिचा दुरुपयोग करू नये, जर दुरुपयोग झाल्यास शासन कठोर कारवाई करेल यात शंका नाही. 

परंतु जर माझ्या खरंच गरज असलेल्या शेतकरी मित्रांना ही माहिती उपयोगी ठरली तर आज लेखकाचा लेख लिहिण्याचा उद्देश साध्य होत आहे.


 विलास संभाजी सूर्यवंशी किनवट ता. किनवट जि. नांदेड* 
मो.९९२२९१००८०