रेल्वे पुलाखाली साचणाऱ्या पाण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी - खासदार हेमंत पाटील
------------------------------------
हिंगोली /नांदेड/ यवतमाळ : हिंगोली लोकसभा क्षेत्रातील हिंगोली ,
हिमायतनगर , वसमत आणि किनवट रेल्वे मार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाखाली
पावसाचे पाणी साचून रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असल्यामुळे, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
त्यामुळे मतदार संघात येणाऱ्या रेल्वे पुलाखालील साचणाऱ्या पाण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी,
अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या बैठकी दरम्यान केली .
भारत सरकारच्या रेल्वे विभागाच्या संसदीय समितीची बैठक रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा
मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली या बैठकीत
खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील रेल्वे संदर्भातील मागण्या सादर केल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे पुलाखाली साचणाऱ्या पाण्याबाबत मुद्दा उपस्थित करून खासदार हेमंत पाटील
यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले ते म्हणाले कि, पावसाळा सुरु झाला कि,
रेल्वे ने रेल्वे मार्गावर बांधलेले पूल काहीच कामाचे राहत नाहीत.
कारण सर्वच पुलाखाली पाणी साचल्यामुळे रहदारी करण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.
पूल तयार करताना रेल्वेचे अधिकारी आणि कंत्राटदार पाण्याचा उतार किंवा पाणी साचल्या नंतर काढून देण्यासाठी कोणतीच उपाय योजना करत नाहीत.
त्यामुळे हे पूल सर्व सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत.
त्यामुळे दैनंदिन कामासाठी गावाबाहेर जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .
तसेच एकदा काम झाल्यानंतर याबाबत वारंवार रेल्वे विभागाशी संपर्क साधूनही कोणीच दखल घेत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत,
असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.
हिंगोली मतदारसंघातील हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण,
साटंबा, माळसेलु, कनेरगावनाका , अंधारवाडी, नांदापूर, वसई, कंजारा ,
पूर, समगा, दुर्गधामणी , हिमायतनगर तालुक्यातील कांडली, जवळगाव, खडकी,
सवना , वसमत तालुक्यातील मुडी रोड , बहिरोबा चोंडी , वापटी -कुपटी , दगडगाव ,
जवळा आणि किनवट तालुक्यातील LC -२ भोकर -मुदखेड क्रॉसिंग , LC-४ भोकर -थेरबन , LC-६ पारवा ,
LC-७ पारवा ( दुसरा पूल ) ५१ ( A ) जवळगाव LC-१० जिरोणा , पूल न. ७२
( A ) सहस्त्रकुंड , पूल न. ७३ ( A ) सहस्त्रकुंड( किनवट रोड) ,
पूल न. ११५ ( A ) बोधडी , पूल न.१३६ ( A ) मदनापूर, पूल न.१३७ ( A )
किनवट ,पूल न. १४२ ( A ) सिरमेटी याठिकाणी पाणी साचत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत ,
त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .
या बैठकीला सदस्य संजीव मित्तल, राहुल जैन ,