Ticker

6/recent/ticker-posts

परधान समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजुंना मदत नादेंड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यात डोंगराळ जंगलव्याप्त भागात वाडी गुडयावर आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो.


परधान समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजुंना मदत 

  
नादेंड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल  तालुक्यात डोंगराळ जंगलव्याप्त भागात  वाडी गुडयावर आदिवासी  समाज  मोठ्या संख्येने  राहतो.

राज्यांत कोरोना संकटाचे थैमान चालु असल्याने कोरोनाच्या या भयाण काळात गेली दोन वर्षे सतत कडक लॉकडाऊन घोषित 
असल्याने हातावरचे पोट असणारी आदिवासी कुटुंब  जगण्याच्या मरण यातना भोगत होते.

 अशाचच अनेक कुटुंब या कोरोना काळात उद्वस्त झालेली पाहायला मिळाली. 

यातच काही कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावले होते. 

लोकांच्या हाताला कोणतेही कामं नाही.

या भागातील आदिवासी कुटुंब इतरत्र कामं करण्यास स्थलांतर करत होते.
मोल मजुरी करून गुजरण करणाऱ्या आदिवासी समजावर या लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्ण निर्माण झाला.

अशा बिकट परिस्थिती  मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या हाताला कोणतेही कामं नसल्याने हातावरचे  पोट असणाऱ्याचे हाल होतांना दिसत होते.

या काळात उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबांच्या यातना ही भयाण होत्या.ह्या सर्व गंभीर परिस्थीतीचा विचार करून आदिवासी परधान समाज कर्मचारी वर्ग एकवटला अन सामाजिक दायित्व भावनेतून  

अडचणीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना मदत करण्याचे निर्णय घेत सोशियल मीडिया गृपद्वारे ऑनलाईन पद्धतीने मदत निधी गोळा करून 
त्या जमा रक्कमेतुन दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तुची खरेदी करून अन्नपूर्णा किट वाटप करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत प्रथम टप्प्यात मौजे पिंपळगांव (सि) , तलाईगुडा , भिलगांव , पळशी लालुनाईकतांडा 
 जरुर , मांडवी ,
गणेशपुर , नागापूर , दरसावंगी , लिंगी , उनकेश्वर , बोथ , उमरी (बा) , निराळा 

आदी गावांना भेटी देत गावांतील अनाथ , अपंग , विधवा , वेडसर , दारिद्य्र रेषेखालील 

भूमिहीन , उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबीयांच्या व्यथा जाणून त्यांना कोरोना पासुन घ्यावयाची काळजी सांगत त्यांना अन्नपूर्णा किट देण्यात आले.
अशा प्रकारे एकूण 50 अन्नपूर्णा किराणा सामानाची किट वाटप करण्यात आले 

असून या उपक्रमाचे अध्यक्ष सुभाष कन्नाके , कार्य अध्यक्ष गोपाल कन्नाके ,

 उपाध्यक्ष रामदास मेश्राम , सचिव मूरहारी कन्नाके , कोषाध्यक्ष शोभा कुमरे , गणेश डोंगरे 

 प्रसिद्धी प्रमुख प्रणय कोवे ,  सदस्य रमेश परचाके 
संतोष पोहूरकर , शशांक कन्नाके  आदीनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

प्रतिनिधी प्रणय कोवे किनवट