मौजे गोकुंदा ग्रामपंचायत - पंचायतीचा नाकर्तेपणाचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे,
शहरातील रस्ते, नाल्याची कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला असताना
शहरातील नाल्याची, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
शासनाकडून मौजे गोकुंदा ग्रामपंचायत - विकासासाठी मिळालेला
निधी अल्प प्रमाणात खर्च करून अनेक सत्ताधार्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले,
त्यामुळे मौजे गोकुंदा शहरात करण्यात आलेले रस्ते, नाल्या उखडली आहेत.
अश्या परीस्थीतीला पाहून ग्रामीण भागातील नागरिक शहरापेक्षा आमचे खेडे बरे आहेत,
असे बोलून दाखवीत आहेत.
स्वच्छतेची तर बोंबाबोंब झाली असून, यासाठी महिन्याला १५ लक्ष खर्च केले
जात असताना ठेकेदार मात्र मुख्य रस्ते साफ करून गल्ली-बोळात सफाई करण्यात कुचराई करत आहे.
त्यामुळे नागरिकांना स्वतः नाल्या साफ कराव्या लागत असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात जीवन जगावे लागते आहे.
पावसाच्या पाण्यामुळे शहराची गटारगंगा झाली असून, डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
छाया - *आपलाच-आदिवासी सेवक*
*जितेंन्द्र अ . कुलसंगे*-----
*भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष*