Nasir Tagale: पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
(Minister Vijay Wadettiwar)
यांनी दिली आहे
Maharashtra Lockdown :
राज्यात कोरोनामुळं (Maharashtra Corona Update)
घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन
(Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत.
पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे
आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील,
अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री
विजय वडेट्टीवार
(Minister Vijay Wadettiwar)
यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत.
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना,
परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम
आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत.
या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत.
या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे.
ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील.
दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले
रेस्टॉरंट, मॉल्स
गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
थिएटर सुरू होतील
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
ई कॉमर्स सुरू राहिल
जिम, सलून सुरू राहणार
पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
बस 100 टक्के क्षमतेने
आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल