Ticker

6/recent/ticker-posts

: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे(pravin tarde) यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ (sarsenapati hambirrao) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत


मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे(pravin tarde) यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ 

(sarsenapati hambirrao) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

या चित्रपटाची पटकथा, कथा संवाद आणि दिग्दर्शन हे प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. 

अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत
 

शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी साकारणार आहे. 

गश्मीरने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '
"सरसेनापती हंबीरराव" हा केवळ एक चित्रपट नाही, तर आपल्या दोन्ही छत्रपतींशी निगडीत एक पवित्र भावना आहे.. 

असे कितीही लॅाकडाऊन आले तरी ही भावना व्यक्त होणार चित्रपटगृहातच.. लवकरच.. 

पण त्या आधी आजच्या या पवित्र पावन दिवशी तुमच्या आमच्या महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन!'.

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठेने देखील या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

त्यामुळे श्रुतीसुद्ध या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे